शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

coronavirus: ठाणे जिल्ह्यात साडेनऊ हजार संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 02:27 IST

ठाणे जिल्ह्यात मार्चच्या १३ तारखेला पहिला रुग्ण मिळून आला होता. त्यानंतर, कोरोनाचा संसर्ग एप्रिल शेवटपर्यंत वाढत होता.

ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात दिवसेंदिवस पसरत आहे. मात्र, स्वॅब घेतलेल्या जिल्ह्यातील २१ हजारांहून संशयितांपैकी साडेनऊ हजारांहून अधिक नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह असल्याची दिलासादायक बाब पुढे आली आहे. ही संख्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या तीनपट आहे. तर, २५४८ नागरिकांना आतापर्यंत लागण झाली असून ७२० अधिक रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. १६१३ रुग्ण सद्य:स्थितीत जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून २३२५ रुग्ण तपासणी अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.ठाणे जिल्ह्यात मार्चच्या १३ तारखेला पहिला रुग्ण मिळून आला होता. त्यानंतर, कोरोनाचा संसर्ग एप्रिल शेवटपर्यंत वाढत होता. १ मे रोजी जिल्ह्याने एक हजारांचा टप्पा ओलांडला. त्यानंतर, कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढल्याने अवघ्या नऊ दिवसांत त्यामध्ये आणखी एक हजार रुग्णांची भर पडल्याने ती संख्या दोन हजार झाली होती. त्यानंतर, तीन दिवसांत रुग्णसंख्या ५०० ने वाढल्याचे आकडेवारीवरून पाहण्यास मिळाले आहे.जिल्ह्यात १३ मार्च ते १२ मे दरम्यान २१ हजार १९४ जणांचे स्वॅब घेण्यात आले. यामध्ये सर्वाधिक आठ हजार १५५ स्वॅब हे ठामपा हद्दीतील संशयितांचे घेतले गेले आहेत. त्यापाठोपाठ नवी मुंबईत सहा हजार ९३६, केडीएमसीत एक हजार ७६८, मीरा भार्इंदर-१५४४, भिवंडी-१३५५, उल्हासनगर-६७०, ठाणे ग्रामीण-२९०, बदलापूर-२४२ आणि सर्वात कमी अंबरनाथ येथील २३४ इतके आहेत. या घेतलेल्या स्वॅबमध्ये ८५६ सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण हे नवी मुंबई येथील आहेत. त्यापाठोपाठ ठामपा ७९७, तर सर्वात कमी १६ रुग्णसंख्या ही अंबरनाथ येथील आहेत.21,194 स्वॅब2325 रु ग्णांचे अहवाल प्रतीक्षेतनवी मुंबई आघाडीवर : निगेटिव्ह अहवालामध्येही नवी मुंबईने आघाडी घेतली आहे. त्याच्या खालोखाल ठामपा आहे. अंबरनाथने आपला सर्वात कमी संख्येचा आकडा कायम ठेवला आहे. तर, दुसरीकडे तपासणी अहवालाच्या प्रतीक्षेत असलेल्या २३२५ रु ग्णांपैकी नवी मुंबई एक नंबरला आहे. त्यापाठोपाठ ठामपा आहे. सर्वात कमी शून्य रुग्ण हे ठाणे ग्रामीणमधील असल्याची माहिती जिल्हा रु ग्णालय प्रशासनाने दिली.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याthaneठाणे