शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची 31वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 14:24 IST

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ही देशभरात नावलौकिक प्राप्त झालेली मॅरेथॉन असून आजपर्यंत अनेक नामवंत खेळाडूंनी या स्पर्धेला आपली हजेरी लावलेली आहे.

ठाणे :  गेले 30 वर्षे अखंडितपणे सुरू असलेली आणि देशभरातील खेळाडूंचे आकर्षण  ठरलेली ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन यावर्षी कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर रद्द करावी लागत असल्याची घोषणा महापौर नरेश म्हस्के यांनी आज केली. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ही देशभरात नावलौकिक प्राप्त झालेली मॅरेथॉन असून आजपर्यंत अनेक नामवंत खेळाडूंनी या स्पर्धेला आपली हजेरी लावलेली आहे.दरवर्षी 25 ते 30 हजार स्पर्धक यात सहभागी होत असतात. दरवर्षी पावसाळ्यात होणारी ही मॅरेथॉन खेळाडूंचे खास आकर्षण तर असतेच शिवाय ठाणे शहरातील अनेक सामाजिक घटक, विद्यार्थी, नागरिक, ज्येष्ठ नागरिक, क्रीडाप्रेमी, सिनेकलावंत या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत असल्यामुळे या स्पर्धेच्या निमित्ताने ठाणे शहर मॅरेथॉनमय होऊन जाते असे चित्र दरवर्षी असते. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनसाठी स्पर्धकांची नोंदणी, विविध विभागाच्या बैठका, तसेच कार्यक्रमाची पूर्वतयारीचे काम हे मॅरेथॉनच्या दोन  महिने आधी सुरू होते, तसेच या सर्व तयारीसाठी संपूर्ण यंत्रणा कार्यरत असते. पण यावर्षी  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या काळजीच्या दृष्टीने अनेक गोष्टींना मर्यादा आल्या आहेत, त्यामुळे यंदा ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन घेणे शक्य नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.

दरवर्षी सुमारे 30 हजारांहून अधिक स्पर्धेक हे राज्यातून ठाण्यात दाखल होत असतात, परंतु यंदा त्यांना स्पर्धेपर्यंत पोहचणे शक्य नाही, तसेच स्पर्धेच्या ठिकाणी सोशल  डिस्टन्सींग राखणे देखील शक्य नाही. तसेच गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव हा  वाढत असल्यामुळे ही स्पर्धा आरोग्याच्या दृष्टीने घेणे योग्य नसल्यामुळे रद्द करावी लागत आहे. या स्पर्धेचे मुख्य आकर्षण असते ते म्हणजे ठाणे जिल्हा आणि परिसरातील शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग. मात्र यंदा शैक्षणिक वर्षे देखील अद्याप सुरू झालेले नाही. एकूणच सध्याची परिस्थिती पाहता, 31 वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन रद्द करण्यात आली असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद  केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस