शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: नियमांचे उल्लंघन: ठाणे पोलीस आयुक्तालयात एकाच दिवसात वाहतूक शाखेची १९४१ वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 00:28 IST

वारंवार आवाहन करुनही वाहनचालक सर्रास सोशल डिस्टसिंगचे नियम न पाळता जादा प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात वाहतूक पोलिसांच्या १८ युनिटच्या पथकांनी एक हजार ९४१ वाहनांवर रविवारी एकाच दिवसात कारवाई केली.

ठळक मुद्देनऊ लाख ७० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल१५५३ दुचाकीस्वारांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करीत सर्रास वाहनांमधून जादा प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या तब्बल एक हजार ५५३ दुचाकीस्वारांसह एक हजार ९४१ वाहन चालकांवर ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाई केली आहे. या चालकांकडून नऊ लाख ७० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या चार विभगातील १८ युनिटच्या निरीक्षकांनी २८ जून रोजी एकाच दिवसात ही कारवाई केली. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असतांनाच नागरिकांनीही सोशल डिस्टसिंगचे नियम पाळण्याचे आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात येत आहे. तरीही सर्रास दुचाकीवरुन डबल सीट, रिक्षांमध्येही दोन पेक्षा जास्त तसेच मोटार कार आणि कॅबमध्येही दोन पेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक होत असल्याची माहिती उपायुक्त काळे यांना मिळाली होती. याच पार्श्वभूमीवर त्यांनी दिलेल्या आदेशानुसार कळवा युनिटने सर्वाधिक १८६ दुचाकींवर, अंबरनाथ युनिटने सर्वाधिक २७ रिक्षांवर तर कोनगाव युनिटने सर्वाधिक ३५ मोटारकारमधून जादा प्रवाशांची वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई केली. संपूर्ण आयुक्तालयात अशा एक हजार ५५३ दुचाकी, १६६ रिक्षा तर २२२ मोटारकार वर कारवाई केली. या प्रत्येक वाहन चालकांकडून पाचशे रुपये दंड वसूल केला असून काहींचा ई चलनाद्वारे दंड आकारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘‘ कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांनी घरी राहणे गरजेचे आहे. त्यामुळे यापुढे कडक नाकाबंदी केली आहे. अनावश्यक आणि जादा प्रवाशांची वाहतूक करणाऱ्यांची वाहने जप्त केली जाणार आहे.अमित काळे, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसtraffic policeवाहतूक पोलीस