शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

Coronavirus News: कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा ठाणे पोलिसांनी केला पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 00:55 IST

कोरोनावरील टोकलीझुमॅब आणि रेमडिसिविर या इंजेक्शनची काळया बाजारामध्ये विक्री करणा-या पाच जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी अटक केली. एका डमी गिºहाईकाच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली.

ठळक मुद्देदोन रेमडिसिविरसह आठ लाखांचा मुद्देमाल जप्तजादा दराने विक्री करतांना पाच जणांना पकडले ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनावरील जीवनरक्षक ठरलेल्या औषधांचा प्रचंड तुटवडा मुंबई ठाण्यात जाणवत असतांनाच टोकलीझुमॅब आणि रेमडिसिविर या इंजेक्शन काळया बाजारामध्ये चढया दराने विक्री करणाºयाअरुण सिंग (३५, रा. घाटकोपर, मुंबई) याच्यासह पाच जणांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून दोन रेमडिसिविरसह आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोरोनावरील ४० हजारांना विक्री किंमत असलेल्या टोकलीझुमॅब या इंजेक्शनची ८० हजारांमध्ये तर तीन हजारांमध्ये मिळणाºया रेमडिसिवीरची थेट आठ पटीपेक्षा जास्त म्हणजे २५ हजारांमध्ये विक्री होत असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोथमिरे यांच्या पथकाने २१ जुलै रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. अरुण सिंग याच्यासह काहीजण रेमडिसिविर आणि टोकलिझुमॅब या अत्यावश्यक इंजेक्शनचा काळया बाजारामध्ये चढया दराने विक्री करण्यासाठी ठाण्यातील तीन पेट्रोल पंप येथे येणार असल्याची खंडणी विरोधी पथ्काला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह खंडणी विरोधी पथकाने अरुण सिंग तसेच सुधाकर गिरी (३७, रा. मुंबई), रवींद्र शिंदे (३५, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई), बसीम शेख,(३२, रा. नवी मुंबई) आणि अमीताब दास (३९, रा. नवी मुंबई) या पाच जणांनरा अटक केली. त्यांच्याकडून दोन रेमडिसिविर, एक टॉकलिझुमॅब इंजेक्शन तसेच इतर कॅन्सर आणि गर्भपाताची औषधे त्याचबरोबर गुन्हयात वापरलेली मोटारकार आणि मोबाईल फोन असा सुमारे पाच लाख १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी औषध निरीक्षक वीरेंद्र रवी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नौपाडा पोलीस ठाण्यात कलम ४२० तसेच औषध किंमत नियंत्रण आदेश तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आाहे.* अशा प्रकारे कोणाचीही या औषधांबाबत जर फसवणूक झाली असेल त्या नागरिकांनी खंडणी विरोधी पथकाकडे ०२२- २५३४८३३६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस