शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
4
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
5
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
6
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
7
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
8
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
9
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
10
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
11
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
12
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
13
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
14
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
15
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
16
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
17
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
18
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
19
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
20
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

Coronavirus News: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त ड्यूटीवर हजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 23:01 IST

कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त कोविड योद्धा विवेक फणसळकर हे सोमवारी पुन्हा ड्यूटीवर हजर झाले. त्यावेळी पुष्पवृष्टी करीत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे जल्लोषात कार्यालयात स्वागत केले.

ठळक मुद्देशानदार सलामी आणि पुष्पवृष्टीने स्वागतहजर होताच घेतली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे सोमवारी पुन्हा ड्यूटीवर हजर झाले. त्यावेळी पुष्पवृष्टी करीत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे जल्लोषात कार्यालयात स्वागत केले. यावेळी मुख्यालयाच्या राखीप पोलीस निरीक्षकांनी बँन्डच्या तालावर त्यांना शानदार सलामी दिली.कोरोनामुळे जिल्हाभर लॉकडाऊन सुरु असतांना त्यासाठी बंदोबस्तावर असलेल्या ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील दीड हजारांहून अधिक पोलीस कोरोनामुळे बाधित झाले. या सर्वच कर्मचाºयांची वैयक्तिकरित्या काळजी घेणारे ठाण्याचे पोलीस आयुक्त फणसळकर हेही ६ सप्टेंबर रोजी कोरोनामुळे बाधित झाले. त्यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना १६ सप्टेंबर रोजी रु ग्णालयातून घरी सोडण्यात आले. काही दिवसाच्या विश्रांतीनंतर सोमवारी फणसळकर कार्यालयात रुजू झाले. सह पोलीस आयुक्त डॉ. सुरेश मेकला, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे (प्रशासन), प्रविण पवार (गुन्हे), अनिल कुंभारे (पश्चिम प्रादेशिक विभाग), दत्ता कराळे (पूर्व प्रादेशिक विभाग) यांच्यासह उपायुक्त प्रियंका नारनवरे, बाळासाहेब पाटील, दीपक देवराज, संजय जाधव, सुभाष बुरसे आणि रिडर अजय घोसाळकर यांनी त्यांचे स्वागत केले. पोलीस आयुक्तालय कार्यालयात त्यांचे आगमन झाल्यानंतर मुख्यालयाचे राखीव पोलीस निरीक्षक सुभाष माने यांनी त्यांना बँडच्या तालावर शानदार सलामी दिली. त्यानंतर पुष्पवृष्टी करीत पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांनी त्यांचे स्वागत केले.* लागलीच कामाचा धडाकाआयुक्तांनी सकाळी ११.३० वाजता सह आयुक्त मेकला यांच्याकडून पुन्हा सूत्रे घेतल्यानंतर त्यांनी विशेष शाखेचे पोलीस आयुक्त बाळासाहेब पाटील, गुन्हे शाखेचे उपायुक्त दीपक देवराज यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाºयांसमवेत बैठक घेतली. त्याचवेळी गेल्या महिनाभरातील गुन्हेगारीचाही त्यांनी आढावा घेतला. पोलिसांनी कोरोना नियंत्रणासाठी बंदोबस्त करतांना स्वत:चीही काळजी घेतली पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस