शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News in Thane : ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी ओलांडला चार हजारांचा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 03:34 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : मंगळवारी सापडलेल्या २४९ नव्या रुग्णांमध्ये ठामपा क्षेत्रात सर्वाधिक ८४ रुग्ण मिळून आल्याने येथील रुग्ण संख्या ही एक हजार ३५३ वर गेली आहे.

ठाणे : जिल्ह्यात मंगळवारी नव्याने २४९ कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्येने चार हजारचा टप्पा ओलांडला असून रुग्णसंख्या चार हजार १६९ इतकी झाली आहेत.त्यातच चार जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १२८ वर गेला आहे. नव्याने १९ रुग्ण सापडल्याने ठाणे ग्रामीणने दोनशेचा आकडा पार केल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली. ग्रामीणमध्ये एकाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ४ झाली आहे.मंगळवारी सापडलेल्या २४९ नव्या रुग्णांमध्ये ठामपा क्षेत्रात सर्वाधिक ८४ रुग्ण मिळून आल्याने येथील रुग्ण संख्या ही एक हजार ३५३ वर गेली आहे. त्यापाठोपाठ नवी मुंबईत ५७ रुग्ण सापडले असून तेथील रुग्ण संख्याही एक हजार ३२१ इतकी झाली आहे. नवी मुंबई दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ३९ वर गेला आहे. कल्याण डोंबिवलीत सापडलेल्या नव्या ३८ रुग्णांमुळे तेथील रुग्ण संख्या ही ५६८ इतकी झाली आहे. त्यातच एक जण दगावला असून मृतांची संख्या १२ झाली आहे. मीरा भार्इंदरला २५ रुग्णांची नोंद झाल्याने तेथील रुग्ण संख्या ३७६ झाली आहे. उल्हासनगर येथे १२ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने एकूण रुग्ण संख्या १३८ झाली आहे. अंबरनाथला १० रुग्णांचे निदान झाल्याने रुग्ण संख्या ४६ झाली आहे.बदलापूरला ३ रुग्ण मिळाल्याने तेथील रुग्ण संख्या ११९ झाली आहे. तर सर्वात कमी म्हणजे अवघा एकच रुग्ण हा भिवंडीत आढळून आल्याने तेथील रुग्ण संख्या ही ४४ झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे