शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
4
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
5
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
6
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
7
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
8
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
9
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
10
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
11
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
12
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
13
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
14
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
15
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
16
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
17
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
18
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
19
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
20
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक

CoronaVirus News in Thane : कोरोनामुक्त प्रभाग समितीस ५० लाख बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 06:31 IST

सेल्फी स्पर्धा गटात नागरिक विषांणूपासून संरक्षणासाठी कोणत्या नाविण्यपूर्ण पद्धती, संकल्पना राबवितात त्याचा व्हिडीओ महापालिकेने दिलेल्या लिंकवर पाठवू शकतात.

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून 'माझा प्रभाग, कोरोनामुक्त प्रभाग' या स्पर्धेचे आयोजन केले असून पंधरा दिवसांत प्रभाग समिती क्षेत्रात कोणताही नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद न होणे आणि सध्याचे बाधित रुग्ण निगेटिव्ह होवून डिस्चार्ज झाल्यास अशा प्रभाग समितीस विकासकामासाठी २५ लक्ष रुपयांचा निधी बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे. तर एक महिन्याच्या कालावधीत नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद न होणे आणि असलेले बाधित रुग्ण बरे होवून डिस्चार्ज मिळालेल्या समितीस विकासकामांसाठी ५० लक्ष रूपयांचा निधी बक्षीस देण्यात येणार आहे.सेल्फी स्पर्धा गटात नागरिक विषांणूपासून संरक्षणासाठी कोणत्या नाविण्यपूर्ण पद्धती, संकल्पना राबवितात त्याचा व्हिडीओ महापालिकेने दिलेल्या लिंकवर पाठवू शकतात. सेल्फ डिकलेरेशन स्पर्धा गटात एखाद्या कुटुंबात कोणी कोरोनाबाधित आढळल्यास त्याची माहिती तसेच कोव्हीड सदृष्य ताप, खोकला, सर्दी ही लक्षणे आढळल्यास त्याची माहिती कुटुंबातील व्यक्तीने महापालिकेसोबत शेअर करावयाची आहे. सेफ्टी क्ल्यू व्हिडीओ स्पर्धेत कोव्हीडचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी, बचाव करण्यासाठी नव्याने कोणकोणत्या उपाययोजना अंमलात आणल्या त्याबाबतची ३० सेकंदाची व्हिडीओ क्लीप तयार करून महापालिकेस पाठवायची आहे.एक्स्ट्रा केअर सेफ्टी बेस्ट प्रक्टीस व्हिडीओ स्पर्धेतंर्गत कुटुंबात भाजीपाला, दूध, अन्नधान्य पुरवठा करणाऱ्या व्यक्तींकडून होम डिलिव्हरीद्वारे प्राप्त वस्तू स्वीकारताना कोणती विशेष काळजी घेतली जाते याची माहिती ३० सेंकदाच्या व्हिडीओद्वारे पाठवायची आहे. याच गटात आपल्या कुटुंबातील व्यक्ती भाजीपाला, दूध, अन्नधान्य किंवा इतर वस्तू स्वत: आणत असतील तर कोणती काळजी घेतात,याचीही माहिती ३० सेकंदाच्या व्हिडीओमधून पाठवायची आहे.विविध गटांत होणार स्पर्धाही स्पर्धा सेल्फी स्पर्धा, सेल्फी क्ल्यू व्हिडीओ, एक्स्ट्रा केअर सेफ्टी बेस्ट प्रॅक्टिस व्हिडीओ, सेन्सिटिव्ह सर्व्हिस एक्स्ट्रा केअर सेफ्टी बेस्ट पॅ्रक्टिस व्हिडीओ, संपूर्ण प्रभाग समिती (भाग १), संपूर्ण प्रभाग समिती(भाग २) अशा गटांत आयोजिली आहे. आपला प्रभाग, शहर कोरोनामुक्त व्हावे, यासाठी नागरिक, संस्था, मंडळे यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, स्थानिक नगरसेवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी केले आहे.

टॅग्स :thaneठाणे