शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

CoronaVirus News: ठाण्यात रेमडेसिवीरचा तुटवडा, नातेवाईक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 12:43 AM

काळ्या बाजारामुळे किमतीत वाढ

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आता रुग्णालयात लक्षणे असलेले रुग्ण दाखल झाल्यानंतर त्यांना तत्काळ बरे करण्यासाठी सध्या रेमडेसिवीर या इंजेक्शनचा वापर अधिक वाढला आहे. परंतु, मागील काही दिवसापासून ठाण्यात त्याचा तुटवडा निर्माण झाला असल्याची बाब समोर आली. महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयातील रुग्णांना देखील याचा साठा अपुरा पडू लागल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली. त्यामुळे रुग्णांना वाचविण्यासाठी त्यांचे नातेवाईक सैरावैरा धावत असून हे इंजेक्शन मिळविण्यासाठी कसरत करीत आहेत. ज्यांच्याकडे ते उपलब्ध होत आहे, त्याठिकाणी त्याची किंमत तिप्पट मोजावी लागत आहे.अत्यवस्थ असलेल्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे अशा रुग्णांसाठी रेमडेसिवीर हे महत्त्वाचे आधार ठरत आहे.  विशेष म्हणजे लक्षणे असलेल्या रुग्णांवर आता लवकर उपचार मिळावेत आणि त्यांना लवकर घरी जाता यावे या उद्देशाने रेमडेसिवीरचा वापर केला जात आहे. त्यामुळे नागरिक चढ्या किमतीला ते खरेदी करत आहेत.किंमत २५०० च्या घरात ८९९ रुपयांना मिळणारे हे इंजेक्शन २१०० ते २५०० हजार रुपयांना मिळत आहे. ते बाहेरून मागवावे लागत असल्याचे मेडिकलचालक सांगत आहेत. पालिकेच्या ग्लोबल रुग्णालयातही  दोन दिवस हे इंजेक्शन उपलब्ध होऊ शकले नसल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली. त्यामुळे येथील रुग्णांना ते बाहेरून मागवावे लागत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या