शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: रामदेवबाबांच्या कोरोनाप्रतिबंधक औषधांचा दुकानांमध्ये पत्ताच नाही, ग्राहकांचे खेटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 00:18 IST

राज्य सरकारने या औषधावर बंदी लागू केल्याचे जाहीर केल्यानंतरही बाबांचे काही भक्त, चाहते औषधाची चौकशी करण्याकरिता कंपनीच्या दुकानांत चकरा मारत आहेत.

स्नेहा पावसकर/अनिकेत घमंडी ठाणे/डोंबिवली : योगगुरु रामदेवबाबा यांच्या कंपनीने कोरोनावर रामबाण उपाय असल्याचा दावा करीत बाजारात आणलेले औषध ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहरांत अद्याप दाखल झालेले नाही. किमान १० दिवस ते येण्याची शक्यता नाही. मात्र, राज्य सरकारने या औषधावर बंदी लागू केल्याचे जाहीर केल्यानंतरही बाबांचे काही भक्त, चाहते औषधाची चौकशी करण्याकरिता कंपनीच्या दुकानांत चकरा मारत आहेत.रामदेवबाबा यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण कोरोनावर औषध निर्माण केल्याचा दावा केला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यग औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्याची घोषणा केली. सरकारने बंदी घातलेले हे औषध जिल्ह्यात विकले जाते किंवा कसे, याची खातरजमा करण्याकरिता दोन प्रतिनिधींनी ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरातील रामदेवबाबांच्या कंपनीच्या दुकानांना ‘ग्राहक’ म्हणून भेट दिली.कोरोनामुळे भयभीत झालेली सामान्य जनता दुकानात जाऊन औषध आले आहे का, याची चौकशी करीत आहे. कधीपर्यंत हे औषध उपलब्ध होईल? किती रुपयांत मिळेल? अशी चौकशी ग्राहक करीत आहेत. या औषधाच्या विक्रीवर सरकारने बंदी आणलेली असल्याकडे काही ग्राहकांचे लक्ष वेधले असता त्यापैकी काहींना बंदीची माहिती होती तर काहींच्या बंदी गावीच नव्हती. मात्र, सध्या तरी हे औषध ठाणे-मुंबईतील कोणत्याच दुकानात उपलब्ध नाही. ८-१० दिवसांत ते विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे, असे दुकानदारांनी सांगितले. औषध बाजारात आले आणि याचा खप वाढला तर इतरांचा बिझनेस होणार नाही. म्हणून बंदी आणली आहे, परंतु बाबा हे औषध विक्रीसाठी आणल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असे ठाण्यातील एका विक्रेत्याने सांगितले.कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांमध्येही औषधाची प्रतीक्षा असल्याचे निदर्शनास आले. मात्र, ते औषध यायला किमान १० दिवसांची प्रतीक्षा ग्राहकांना करावी लागणार असल्याचे दुकानदार सांगत आहेत. डोंबिवलीत केळकर पथ, मानपाडा रस्ता येथील रामदेवबाबांच्या कंपनीच्या दुकानांमध्ये शुक्रवारपासून औषधाची मागणी केली जात आहे.या औषधाची विचारणा करणाऱ्या एका ग्राहकाला कोरोनावर अद्याप जगभरात औषध सापडले नसल्याचे माहीत आहे का, असे विचारले असता रामदेवबाबांच्या औषधाने कोरोना बरा झाला नाही, तर निदान तो होण्याची शक्यता कमी होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.>राजकारण नको...राज्य सरकारच्या बंदीच्या निर्णयाबाबत काही ग्राहकांनी व दुकानदारांनी नाराजी प्रकट केली. बाबांचे औषध किती प्रभावी आहे, यापेक्षा आम्ही ते रामदेवबाबांवरील श्रद्धेपोटी घेणार असल्याचे एका ग्राहकाने सांगितले. कोरोना व त्यावरील औषध यावरुन तरी राजकारण व्हायला नको, असे मत एका दुकानदाराने व्यक्त केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस