शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: 'चीनमुळे आम्ही भारत, रशियाला गमावून बसलो'
2
आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२५, व्यवसायात लाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल, रमणीय ठिकाणी प्रवासाला जा
3
अजित पवार यांना 'दादा'गिरी अंगलट; आधी फोनवरून झापलं, नंतर दिलं स्पष्टीकरण
4
Mumbai: १४ पाकिस्तानी ४०० किलो आरडीएक्ससह देशात घुसले
5
बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन
6
ganesh visarjan 2025: बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज
7
महापालिकेची पूर्वतयारी परीपूर्ण, राज्य निवडणूक आयुक्त आढाव्यानंतर समाधानी
8
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
9
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
10
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
11
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
12
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
13
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
14
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
15
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
16
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
17
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
18
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
19
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
20
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!

CoronaVirus News: 'पालकांनो, लहान मुलांना जपा, कोरोनाचा धोका वाढतोय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 00:23 IST

CoronaVirus News: वर्षभरात दहा वर्षांखालील ८५२ मुले बाधित : काळजी घेण्याचे आव्हान

- हितेन नाईकपालघर :  राज्यात लहान मुलांना कोरोनाने विळख्यात ओढल्याचे प्रमाण वाढत असताना आता पालघर जिल्ह्यातील दहा वर्षांखालील ८५४ बालकांना कोरोनाने आपल्या कवेत ओढले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह आपल्या लहान बालकांची काळजी घेण्याचे आव्हान पालकांना पेलावे लागणार आहे.जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट वेगाने हातपाय पसरू लागली असून, जिल्हा प्रशासनाने ही लाट रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. एकीकडे लसीकरण केंद्र वाढवून ४५ आणि त्यावरील वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून, टेस्टिंग, ट्रेकिंग आणि ट्रेसिंगद्वारे बाधित रुग्णांवर तात्काळ उपचाराचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे.सध्या जिल्ह्यात एकूण ५३ हजार ६२५ पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली असून, एक हजार २४१ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चार हजार ९०९ रुग्ण सध्या कोरोनाबाधित आहेत. जिल्ह्यात दररोज मोठ्या संख्येने बाधित रुग्ण आढळून येत असून, वसई-विरारमध्ये कोरोना वाढीची संख्या मोठी चिंताजनक आहे. कोरोनाच्या विळख्यातून एकही तालुका सुटलेला नाही.मार्च २०२० पासून ते २४ मार्च २०२१ दरम्यानच्या वर्षभरात दहा वर्षांखालील ४५२ मुले, तर ४०० मुली अशी एकंदर ८५२ मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. १० ते २० वयोगटातील ९७८ मुले, तर ७१५ मुली अशी एकूण एक हजार ६९३ बाधित, २१ ते ३० वयोगटातील दोन हजार मुले व एक हजार ५०० मुली अशा एकूण तीन हजार ५०० मुली, ३१ ते ४० वयोगटातील दोन हजार २०० तरुण, तर एक हजार ३५७ तरुणी अशा एकूण तीन हजार ५५७ बाधित, ४० ते ५० वयोगटातील एक हजार ७९९ पुरुष तर एक हजार १०० महिला अशा एकूण दोन हजार ८९९ पुरुष-महिला बाधित होत्या, तर ५१ ते ६० वयोगटातील ज्येष्ठांपैकी एक हजार ४६० पुरुष, तर ८३६ महिला अशा एकूण दोन हजार २९६ ज्येष्ठ बाधित आढळून आले आहेत. ६१ ते ७० वयोगटातील ६७९ पुरुष तर ४६० महिला असे एकूण एक हजार १३९ बाधित, तर ७१ ते ८० वयोगटातील २६० पुरुष, तर १६५ महिला अशा एकूण ४२५ ज्येष्ठ बाधित झाले आहेत, तर ८० वयोगटातील ५८ पुरुष, तर ४१ महिला असे एकूण ९९ ज्येष्ठ नागरिक कोरोनाबाधित झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.एप्रिल महिन्यातील एकूण कोरोना रुग्णांची आकडेवारी१ एप्रिल-         ३७४२ एप्रिल-     ५२१३ एप्रिल-     ५८५४ एप्रिल-     ६७९५ एप्रिल-     ६३९६ एप्रिल-     ७४५

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या