शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनाचे फक्त ५० रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 00:54 IST

CoronaVirus News in Thane : विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयातील चांगली उपचारपद्धती, तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तसेच औषधोपचारांसह सकस आहारामुळे रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे.

ठाणे : एकेकाळी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या यंत्रणेवर ताण येत होता. अपुऱ्या पडणाऱ्या खाटांमुळे काही वेळा वाॅर्डातील जमिनीवर गाद्या टाकून रुग्णांवर उपचार करावे लागले. आतापर्यंत दोन हजार ९७७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून सध्या केवळ ५० रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. ही सकारात्मक आणि आशादायी बाब असल्याचे ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयातील चांगली उपचारपद्धती, तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तसेच औषधोपचारांसह सकस आहारामुळे रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. मार्च महिन्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय हे केवळ कोरोनाग्रस्तांसाठी ठेवण्यात आले. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत कोरोनाचा कहर वाढल्याने जिल्हा रुग्णालयातही वाढत्या रुग्णांसाठी खाटांची संख्या अपुरी पडू लागली होती. सर्वसामान्य गरीब रुग्णांना जिल्हा रुग्णालयाचा मोठा आधार मिळाला. तज्ज्ञ डॉक्टर आणि सोयीसुविधांमुळे अनेक सेलिब्रिटींनीही या रुग्णालयाला पसंती दिली. औषधोपचारांबरोबरच करमणुकीसाठी संगीतापर्यंत सर्व सुविधा रुग्णांना येथे देण्यात आल्या. याशिवाय येथील डाॅक्टरांसह एकूणच यंत्रणेने घेतलेल्या अथक परिश्रमांची फलश्रुती म्हणून कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूचे रुग्ण ठाण्यात सद्य:स्थितीत कमी झाले आहेत.जिल्हा सामान्य रुग्णालयात २०० खाटांची सुविधा आहे. त्यात २५ अतिदक्षता आणि १२५ ऑक्सिजन, तर ५० सामान्य कोरोना रुग्णांच्या खाटांचा समावेश आहे. याठिकाणी दाखल झालेल्या तीन हजार ५०३ रुग्णांपैकी तब्बल दोन हजार ९७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर, काही जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे