शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: ठाण्यात एकाच दिवशी एक हजार २७७ रुग्णांनी केली कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 21:48 IST

ठाणे महापालिका क्षेत्रात शनिवारी एकाच दिवशी तब्बल एक हजार २७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा विक्रम असून प्रकृती सुधारल्यामुळे घरी परतणाऱ्या रुग्णांसह पालिका प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देरिकव्हरी रेट ६४ टक्क्यांवरठाणेकरांना मोठा दिलासायापूर्वी एकाच दिवशी ६६४ रुग्ण झाले होते बरे

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे १५ हजार ५१५ कोरोना बाधितांची संख्या असलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रात शनिवारी एकाच दिवशी तब्बल एक हजार २७७ रु ग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा विक्र म असून प्रकृती सुधारल्यामुळे घरी परतणाºया रुग्णांसह पालिका प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे.ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्या ही १८ जुलैपर्यंत १५ हजार ५०० च्या घरात होती. रोज किमान यामध्ये ३०० पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने ठाणेकरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून गेल्या २० दिवसांपासून कडकडीत लॉकडाऊनही जाहीर केला आहे. त्याचबरोबर मिशन झिरो अंतर्गतही पालिकेच्या सर्व नऊ प्रभाग समितींमध्ये मोबाईल डिस्पेन्सरी सुरु करण्यात आली आहे. त्यातून तपासणी, निदान आणि तातडीने उपचार करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे कोरोना वाढीवर नियंत्रण आणण्यास काहीसे यश मिळत असून रिकव्हरी रेटही वाढल्याची बाब समोर आली, असा पालिका प्रशासनाचा दावा आहे. ठाण्यात सध्या विविध रु ग्णालयांमध्ये पाच हजार ३२४ कोराना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. तब्बल नऊ हजार ६४५ रु ग्ण आता बरे होऊन सुखरुप घरी परतले आहेत. यामध्ये लहान मुलांपासून ते १०४ वर्षांच्या आजोबांचाही समावेश आहे. विशेष शनिवारी एकाच दिवशी 1एक हजार २७७ रु ग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे ठाणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

ठाण्यात यापूर्वी एकाच दिवशी ६६४ रु ग्ण बरे झाले होते. हा रेकॉर्ड शनिवारी मोडीत निघाला असून दुप्पटीने रु ग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे ठाण्याचा रिकव्हरी रेटही ५६ वरुन ६४ टक्क्यांवर पोहचल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य