शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयात आता अधिकारी-नागरिकांची होणार ई-भेट! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 13:52 IST

CoronaVirus News : कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरल्याने नागरिकांना सुद्धा पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयात तसेच विभागीय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयात थेट जाता येणार नाही.

मीरारोड - मीरा भाईंदर व वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस आयुक्त व वरिष्ठ अधिकारी आता नागरिकांना थेट भेटणार नाहीत. अर्जदार नागरिकांना सोमवार १९ एप्रिलपासून ऑनलाईन भेटून त्यांच्या समस्या पोलीस अधिकारी सोडवणार आहेत. 

कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरल्याने नागरिकांना सुद्धा पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयात तसेच विभागीय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयात थेट जाता येणार नाही. पोलीस आयुक्तालयाने नागरिकांसाठी ८५९१३३६६९८ हा व्हॉट्सअॅप क्रमांक तसेच आयुक्तालयाच्या ईमेल आयडीवर तक्रारी, समस्या पाठवण्याचे आवाहन केले आहे.

नागरिकांनी ऑनलाईन माध्यमातून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संभाषण साधायची वेळ व दिनांक सुद्धा आधी द्यायचा आहे.  त्यानंतर पोलीस विभागाकडून नागरिकांना ऑनलाईन भेटीची वेळ व दिनांक कळवळी जाणार आहे. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी रोज दुपारी ३ ते ५ या वेळेत ई - भेट म्हणजेच ऑनलाईनद्वारे पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस अधिकारी हे नागरिकांच्या समस्या, तक्रारी वर थेट चर्चा करतील व निराकरण करतील. 

२३ एप्रिलपासून दर शुक्रवारी अधिकारी आणि ठाणे अंमलदार यांच्याशी सुद्धा ई - भेट पद्धतीने संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतील. कोरोनाचा संसर्ग वाढत असून संचारबंदी असल्याने नागरिकांनी सुद्धा घराबाहेर पडू नये. यासाठी सदर ई भेट सुविधा सुरु करण्यात आल्याची माहिती पोलिसांच्यावतीने देण्यात आली आहे .   

टॅग्स :PoliceपोलिसMira Bhayanderमीरा-भाईंदरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस