शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, शनिवारी सापडले ६४५ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 00:53 IST

CoronaVirus News: ठाण्यात १६३ नवे रुग्ण आढळले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात आता ४६ हजार ६६६ बाधित रुग्ण झाले असून एक हजार १५२ मृत्यूंची नोंद झाली आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येत मोठी घट पाहायला मिळत असून शनिवारी ६४५ नवे रुग्ण आढळल्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता दोन लाख ११ हजार ५२२ झाली आहे. तर, १९ जणांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या आता पाच हजार ३४२ वर पोहोचली आहे.ठाण्यात १६३ नवे रुग्ण आढळले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात आता ४६ हजार ६६६ बाधित रुग्ण झाले असून एक हजार १५२ मृत्यूंची नोंद झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत नव्याने १३६ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या ५० हजार ६४ झाली आहे. तर, एकाचा मृत्यू झाला आहे. उल्हासनगरला १९ नवे रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. भिवंडी शहरात १४ बाधित आढळले. मीरा-भाईंदरमध्ये ८२ रुग्णांची तर पाच मृत्यूंची नोंद झाली. अंबरनाथमध्ये ३१ रुग्ण सापडले असून तिघांच्या मृतांची नोंद आहे.  बदलापूरमध्ये १३ रुग्ण सापडल्याने आता बाधित सात हजार ३५७ झाले आहेत. जिल्ह्यातील गावपाड्यांमध्ये ३८ रुग्ण सापडले असून तीन मृत्यू झाले आहेत. ग्रामीण भागात १६ हजार ८४४ बाधित झाले असून मृतांची संख्या ५३० आहे.

नवी मुंबईत १४९ रुग्ण वाढले   नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रात शनिवारी १४९ रुग्ण वाढले असून २०२ जण बरे झाले आहेत. शहरात फक्त १८१७ रुग्ण शिल्लक आहेत. तिघांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ९०१ झाला आहे. मनपाने आतापर्यंत तब्बल २ लाख ८१ हजार नागरिकांची चाचणी पूर्ण केली आहे.  

वसई-विरारमध्ये ९२ रुग्ण कोरोनामुक्त वसई : वसई-विरार महापालिका हद्दीत शनिवारी दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर ९२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. याचवेळी ६६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. आता शहरांत ९२१ रुग्ण रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

रायगड जिल्ह्यात १३५ कोरोना रुग्णअलिबाग : रायगड जिल्ह्यात शनिवारी १३५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या ५३ हजार ९९९ वर पोहोचली आहे. दिवसभरात २ जणांचा मृत्यू झाला तर १६४ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस