लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचे रिडर असलेल्या एका सहायक पोलीस निरीक्षकासह नऊ पोलिसांना बुधवारी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बाधितांची संख्या ६१५ इतकी झाली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ८ जुलै रोजी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील दोन अधिकारी आणि सात कर्मचारी अशा नऊ पोलिसांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आयुक्तालयात एका महिला पोलीस उपायुक्तांना लागण झाल्यानंतर थेट आता पोलीस आयुक्तांच्याच रिडर असलेल्या अधिकाºयालाही लागण झाल्यामुळे पोलीस आयुक्तालयात एकच खळबळ उडाली आहे. याशिवाय, विठ्ठलवाडीचे एक उपनिरीक्षक तसेच शांतीनगर आणि मानपाडा येथील प्रत्येकी दोन तर विष्णुनगर, टिळकनगर आणि वाहतूक नियंत्रण शाखेतील प्रत्येकी एकाचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Coronavirus News: ठाण्याच्या पोलीस आयुक्तांच्या रिडरसह आणखी नऊ पोलिसांना कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 23:49 IST
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील दोन अधिकारी आणि सात कर्मचारी अशा नऊ पोलिसांना बुधवारी कोरोनाची लागण झाली. यामध्ये थेट पोलीस आयुक्तांच्या रिडरचाही समावेश असल्यामुळे पोलिसांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
Coronavirus News: ठाण्याच्या पोलीस आयुक्तांच्या रिडरसह आणखी नऊ पोलिसांना कोरोनाची लागण
ठळक मुद्देदोन अधिकारी आणि सात कर्मचाऱ्यांचा समावेश बाधित पोलिसांची संख्या ६१५