शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : पालघरमध्ये दिवसभरात हजाराहून जास्त कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 00:04 IST

CoronaVirus News : डहाणूत ५८, जव्हारमध्ये ९७, मोखाडामध्ये १९, पालघरमध्ये १७२, तलासरीत १६, विक्रमगडमध्ये १६, वाडामध्ये २८ तर वसई-विरारमध्ये ७०० रुग्ण आढळले.

पालघर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह वसई-विरार शहर महापालिका परिसरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. आरोग्य विभागाच्या शनिवारी सकाळच्या अहवालानुसार, जिल्ह्यात एकाच दिवसांत अकराशेपेक्षा जास्त बाधित रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती चिंताजनक दिसून येत आहे.माजी आरोग्यमंत्री डाॅ. दीपक सावंत यांनी जिल्ह्यातील कोरोनास्थितीचा आढावा घेतला. डहाणूत ५८, जव्हारमध्ये ९७, मोखाडामध्ये १९, पालघरमध्ये १७२, तलासरीत १६, विक्रमगडमध्ये १६, वाडामध्ये २८ तर वसई-विरारमध्ये ७०० रुग्ण आढळले. दरम्यान, जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असून तेथील आरोग्य व्यवस्था कमी पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. सावंत यांनी पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांची तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांची भेट घेऊन चर्चा केली. रिव्हेरिया (देहर्जे-विक्रमगड) या हॉस्पिटललाही त्यांनी भेट दिली.डॉ. सावंत यांनी दै. ‘लोकमत’ला सांगितले की, मधल्या काळात डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ यांना पेशंट कमी झाल्याने दूर केले गेले. त्यामुळे १७० बेड्स व आयसीयू हॉस्पिटल्सचा कारभार पाच-सहा डॉक्टर्स पाहत असून यात एकच एमडी फिजिशियन आहे. स्थानिक पॅरामेडिकल स्टाफ हा इतरत्र जास्त वेतन मिळते म्हणून गेला. बोईसर एमआयडीसीमध्ये एमआयडीसी, जिंदालसारख्या कंपन्यांना आवाहन करून सुविधा तयार करणे गरजेचे आहे.

आर्म फोर्स मेडिकलची मदत घ्याग्रामीण भागात दररोज सुमारे ३०० रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आर्म फोर्स मेडिकल कॉलेजची मदत घेऊन टेन्ट हॉस्पिटलची उभारणी केल्यास लष्कराच्या डॉक्टर्स व नर्सिंग स्टाफच्या सहाय्याने पूर्ण क्षमतेने ग्रामीण भागात सुविधा उभ्या करता येतील, अशी सूचना माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. शासकीय आरोग्य व्यवस्था कमी असल्याने कोविड निधी (जिल्हा नियोजन) यातील १६.५ टक्के दिला जातो, त्यापैकी ६ टक्के निधी खर्च करण्याचे अधिकार दिले जावेत, अशी सूचना त्यांनी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसpalgharपालघर