शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News in Mira Bhayandar : मीरा भाईंदरमध्ये गेल्या 10 दिवसांत कोरोनाचे 242 रुग्ण,  9 जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 15:18 IST

CoronaVirus News in Mira Bhayandar : मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीत 27 मार्च ते 15 मे या 46 दिवसांच्या कालावधीत शहरात 291 कोरोना रुग्ण सापडले तर 8 जणांचा मृत्यू झाला होता.

मीरारोड : मीरा भाईंदरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. झोपडपट्टी भागात कोरोनाची लागण चिंताजनक बनली आहे. सोमवारपर्यंत 533 रुग्ण व 17 जणांचा मृत्यू झाला. गेल्या 10 दिवसांत कोरोनाचे तब्बल 242 रुग्ण सापडले असून 9 जणांचे बळी गेले आहेत. त्या तुलनेत आधीच्या 46 दिवसांमध्ये 291 कोरोना रुग्ण सापडले व 8 जणांचा मृत्यू झाला होता.

मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीत 27 मार्च ते 15 मे या 46 दिवसांच्या कालावधीत शहरात 291 कोरोना रुग्ण सापडले तर 8 जणांचा मृत्यू झाला होता. 16 ते 25 मे या गेल्या 10 दिवसांत रोज दोन अंकी कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. या 10 दिवसांत 242 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. 22 मे रोजी तर विक्रमी 51 इतके रुग्ण सापडले होते. गेल्या 10 दिवसांत मृत्यूचे प्रमाण देखील वाढले असून 9 जणांचा बळी गेला आहे.25 मेपर्यंत सापडलेल्या 533 कोरोना रुग्णांपैकी मीरारोड मध्ये 284  तर भाईंदर मध्ये 249 इतके कोरोनाचे रुग्ण आहेत. 15 मे पर्यंत 202 कोरोना रुग्ण बरे झाले होते. पण गेल्या 10 दिवसात 116 रुग्ण बरे झालेले आहेत. आतापर्यंत 318 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असले तरी वाढते रुग्ण व त्यातही गणेश देवलनगर, भोलानगर, जय अंबेनगर, इंदिरा कोठार आदी झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा फैलाव देखील चिंतेचा विषय बनला आहे. 

गणेश देवलनगर सह शिवसेना गल्ली व नयानगर कोरोनाचे हॉट स्पॉट बनले आहेत. महापालिकेच्या शासन अखत्यारीतील भिमसेन जोशी रुग्णालया सह अन्य काही खाजगी रुग्णालयात देखील कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. शिवाय लक्षणे न दिसणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी कोवीड केअर सुरु केले आहे. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMira Bhayanderमीरा-भाईंदर