शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: लॉकडाऊन काळात प्रभागातच बेकायदा बांधकामांना ऊत आल्याने महापौर संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 18:26 IST

CoronaVirus News: महत्त्वाचे म्हणजे महापालिका प्रशासन देखील या अनधिकृत बांधकामांवर कारवाईस टाळाटाळ करत आहे. आपण याबाबत आयुक्तांना तक्रार केल्याचे महापौर यांनी सांगितले. 

मीरा रोड - कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे एकीकडे चिंता वाढत असताना दुसरीकडे लॉकडाऊन असूनदेखील खुद्द मीरा-भाईंदरच्या महापौर ज्योत्स्ना हसनाळे व अन्य तीन भाजपा नगरसेवकांच्या प्रभागात बेकायदेशीर बांधकामे मात्र उघडपणे सुरू आहेत. महत्त्वाचे म्हणजे महापालिका प्रशासन देखील या अनधिकृत बांधकामांवर कारवाईस टाळाटाळ करत आहे. आपण याबाबत आयुक्तांना तक्रार केल्याचे महापौर यांनी सांगितले. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यात महापालिका यंत्रणा व्यस्त असल्याचे सांगण्यात  येत आहे. परंतु दुसरीकडे धारावी झोपडपट्टीचे स्वरूप आलेल्या काशिमीराच्या माशाचा पाडा मार्ग, मीनाक्षी नगर, मांडवी पाडा, डाचकूल पाडा आदी परिसरात कोरोनाच्या संसर्ग काळात देखील बेकायदा बांधकामांना ऊत आला आहे. मुळात हा परिसर ना विकास क्षेत्र , इको सेन्सिटिव्ह झोन, पालिका आरक्षण तसेच आदिवासी मालकीच्या जमिनी अशा क्षेत्रात मोडत असताना देखील येथे राजरोसपणे पालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी, राजकारणी व झोपडीमाफीयांच्या संगनमताने प्रचंड प्रमाणात अनधिकृत बांधकामे चालत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. परंतु सदर बेकायदा बांधकामांवर व बांधकामे करणाऱ्या माफियांवर ठोस कारवाई करणे तर सोडाच उलट वीज, पाणी, कर आकारणी आदी सर्व सोयी-सुविधा करून दिल्या जात आहेत. या बेकायदा बांधकामांमुळे येथील विकास नियोजनाचा बट्ट्याबोळ झालेला असून, नागरी समस्या वाढत आहेत. येथील आरक्षणाच्या जमिनी हडप करण्यात आल्या आहेत. अधिवेशनात देखील येथील आदिवासींच्या जमिनी  वरील बेकायदा बांधकामांबाबत मुद्दा उपस्थित केला गेला होता.  या पालिका प्रभाग 14 मध्ये भाजपाचे सचिन म्हात्रे, मीरादेवी यादव, सुजाता पारधी आणि ज्योत्स्ना हसनाळे असे चार नगरसेवक असून, अनिल भोसले हे माजी नगरसेवक आहेत. ज्योत्स्ना तर आता आता तर शहराच्या प्रथम नागरिक आहेत. परंतु महापौरांच्या प्रभागातच कोरोनामुळे बंदी असून देखील येथील मीनाक्षी नगर, मांडवी पाडा, डाचकुडा आदी भागात सर्रास बेकायदा बांधकामे सुरू आहेत. आधीच्या बांधकामांवर कारवाई करणे सोडाच पण सदर नव्याने सुरू असलेल्या बांधकामांबाबत देखील कारवाईस कमालीची टाळाटाळ केली जात आहे. वास्तविक बांधकाम करण्यास बंदी असताना यासाठी सिमेंट, विटा, रेती आदी साहित्य तसेच मजूर कुठून आणले, असा प्रश्नसुद्धा येथील जागरूक नागरिकांनी केला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनासुद्धा जबाबदार धरून ठपका ठेवा, अशी मागणी मनसेचे दिनेश कनावजे आदींनी केली आहे. 

याबाबत महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी लॉकडाऊनमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात संताप व्यक्त केला. अशा माफियांवर कठोर कारवाई करा. त्यांची हिम्मत होतेच कशी? पालिका अधिकारी करतात तरी काय ? असा सवाल केला. आयुक्तांना कारवाई करण्यास सांगितले असल्याचे त्या म्हणाल्या. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस