शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: बाळकूम, कोलशेत, ढोकाळीमध्ये उत्स्फूर्त लॉकडाऊन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 14:34 IST

CoronaVirus News: या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी नागरिकांकडूनच केली गेली आहे. इतर अत्यावश्यक सेवेची दुकाने देखील बंद होती.

ठाणे :  संपूर्ण ठाण्यात लॉकडाऊन गोंधळ असताना गेल्या १५ दिवसात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीच्या अंतर्गत येत असलेल्या कोलशेत ,ढोकळी आणि बाळकूम परिसरात लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनीच या भागात सोमवार पासून ७ दिवस उत्सुर्तपणे बंद सूरु केला आहे. सोमवार पासून हा लॉकडाऊन सुरु करण्यात आला असून यामध्ये केवळ मेडिकल,हॉस्पिटल,आणि दुध व्यवसायच सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी नागरिकांकडूनच केली गेली आहे. इतर अत्यायवशक सेवेची दुकाने देखील बंद होती.

ठाणे शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढतच असून  माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद झाली असल्याने इथल्या रहिवाशांमध्ये चिंतेचे वातारण आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शिवसेनेचे ज्येष्ठ नागरसेवक संजय भोईर यांनी बाळकूम, कोलशेत आणि ढोकाळी परिसरातील काही सोसायटी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांनाची बैठक घेऊन असून स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सोमवार पासून पुढील सात दिवस हा लॉकडाऊन असणार आहे अशी माहिती भोईर यांनी दिली आहे. 

या लॉकडाऊनची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी केवळ अत्यावश्यक सेवा, मेडिकल, हॉस्पिटल्स, रुग्णवाहिका तसेच दूध व्यवसाय (सकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत )वगळून सर्व प्रकारचे किराणा स्टोअर्स,भाजीपाला,मच्छी विक्रेते, मटण चिकन विक्रेते सात दिवस बंद राहणार आहे. पहिल्या दिवसांपासून या भागात शुकशुकाट दिसत होता, नागरिक देखील रस्त्यावर फिरताना दिसत नव्हते."अनलॉक नंतरच रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. या परिसरात २५० पेक्षा अधिक सोसायटी असून तेवढाच ५० टक्के भाग हा झोपडपट्टीचा भाग आहे. त्यामुळे या ठिकाणचे व्यवसाय पुन्हा सुरू झाले, सोशल डिस्टेंसिंगचे पालन न केल्यामुळे संख्या वाढली असून याला आळा घालण्यासाठी हा सात दिवसांचा लॉकडाऊन उत्स्फूर्तपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांना देखील लॉकडाऊन हवा होता . त्यामुळे हा लॉकडाऊन घेतला असून त्याला प्रतिसाद मिळत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस