शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : अंबरनाथमध्ये पहिल्याच दिवशी पुन्हा लॉकडाऊनचा फज्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 02:10 IST

मंगळवारी पहिल्या दिवशी शहरातील सर्व दुकाने बंद असली तरीही शहरातील गर्दी किंचितही कमी झाली नव्हती. त्यामुळे हा लॉकडाऊन नेमका कुणासाठी आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत असल्याने शहरात पुन्हा लॉकडाऊन करावा अशी मागणी राजकीयआणि सामाजिक संघटनांनी केली होती. त्यानुसार २३ ते ३० जूनपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी शहरातील सर्व दुकाने बंद असली तरीही शहरातील गर्दी किंचितही कमी झाली नव्हती. त्यामुळे हा लॉकडाऊन नेमका कुणासाठी आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.मंगळवारपासून शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले असले तरी शहरातील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. आज शहरातील बहुसंख्य दुकाने आणि भाजी विक्रेत्यांची दुकाने बंद होती. असे असले तरी शहरातील वाहतूक आणि नागरिकांची गर्दी किंचितही कमी झालेली दिसली नाही. त्यामुळे अंबरनाथकरांना फायदा होणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.>अंबरनाथच्या पश्चिम भागात रस्त्यावर नागरिक विनाकारण फिरताना दिसत होते. तर अनेक नागरिक दुचाकीवर विनाकारण फिरत होते. या सर्वांना रोखण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या. शहरात परिस्थिती भयंकर असतानाही नागरिक सतर्कता दाखवत नसल्याचे दिसत आहे. एमआयडीसी सुरु असल्याने नियमित कामावर जाणारे कामगार आपल्या ठरलेल्या वेळेवर निघून गेले तर दुसरीकडे किराणामाल भरण्याच्या नावावर नागरिक बाहेर फिरत होते. या सर्वांना रोखण्यासाठी पोलिसांचा कोणताही खास बंदोबस्त शहरात नव्हता.>दारूची दुकाने सुरूशहरात लॉकडाऊन जाहीर झालेला असतानाही शहरातील काही मुजोर दारू विक्रेत्यांनी आपली दुकाने सुरू ठेवली होती. या दुकानात नागरिकांनी गर्दी केली होती. अखेर पालिकेने या दुकानदारांवर कारवाई केली. स्टेशन रोडवरील अंबर वाईन्स या दुकानदाराने सकाळपासूनच दुकान सुरू ठेवल्याने त्याच्यावरही पालिकेने कारवाईचा बडगा उगारला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस