शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : कोरोनाबाधेवर लिंबू, संत्री, मोसंबीचा उतारा! , मागणी अन् दरही वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 23:42 IST

CoronaVirus News : या आजारावर मात करण्यासाठी व शरीरात प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी दररोज लिंबू, संत्री, मोसंबी ही फळे खाण्याचा सल्ला अनेक डॉक्टर देतात.

- वसंत भोईरवाडा : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे सल्ले डॉक्टरांकडून दिले जातात. अनेकजण घरच्या घरी वेगवेग‌ळे उपाय करतात. विविध पदार्थांचे सेवन करतात. या आजारावर मात करण्यासाठी व शरीरात प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी दररोज लिंबू, संत्री, मोसंबी ही फळे खाण्याचा सल्ला अनेक डॉक्टर देतात. त्यामुळे या फळांना मागणी वाढली असून त्याचे दरांमध्येही वाढ झाली आहे. ही दरवाढ सामान्यांना परवडत नसली तरी सामान्यांकडून याची सर्रास खरेदी केली जाताना दिसते.

कोरोना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी एकीकडे शासन आपल्या पातळीवर प्रयत्न करत असताना सामान्य जनता आपापले घरगुती काढे, ज्यूस, औषधोपचारही करताहेत. कोरोना काळात दररोज लिंबू, संत्री, मोसंबी ही फळे खाणे गरजेचे असल्याचे डाॅक्टरांचे मत आहे. तसेच उन्हाचा तडाखा वाढल्याने जुस साठी देखील या फळांना वाढती मागणी आहे. 

या फळांमध्ये व्हीटॅमीन सीचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रूग्णांची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत होते. त्यामुळे ही फळे खाणे गरजेचे आहे.- डाॅ. समाधान पगारे, वैद्यकीय अधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्र, कुडूस

कोरोना रूग्णांनी दैनदिन आहारामध्ये लिंबू, मोसंबी, संत्री ही फळे खाणे गरजेचे आहे. त्यातून व्हीटॅमीनसीचे सेवन होते,- डाॅ. गिरीश चौधरी, कुडूस

फळांच्या किमतीत २५ टक्क्यांनी वाढकोरोनाच्या आजारावर उतारा म्हणून या फळांकडे पाहिले जात असले तरी मागणीच्या तुलनेत पुरेशा प्रमाणात त्याची उपलब्धता नसल्याने फळांच्या किंमतीत २५टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे कुडूस येथील फळ विक्रेते शैलेश चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस