शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: गेल्या दोन दिवसात आयुक्तालयातील आणखी २६ पोलिसांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 01:54 IST

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील कोरोना बाधित पोलिसांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या ४८ तासांमध्येच २६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. आतापर्यंत ३३४ पोलिसांनी कोरोनावर मात केली असून २२ अधिकारी आणि १३६ कर्मचारी अशा १५८ पोलिसांवर वेगवेगळया रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

ठळक मुद्दे बाधितांची संख्या ४९५ च्या घरातआतापर्यंत ३३४ पोलिसांनी केली कोरोनावर मात

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: नागरिकांप्रमाणेच पोलिसांमध्येही कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या ४८ तासांमध्येच २६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये सात अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ४९५ पोलिसांना लागण झाली असून ३३४ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २८ जून रोजी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील दहा तीन अधिकाऱ्यांसह दहा पोलिसांना कोरोनाची लागण झाली. त्यापाठोपाठ २९ जून रोजी आलेल्या अहवालानुसार राज्य राखीव दलाच्या (एसआरपीएफ) निरीक्षकासह टिळकनगर येथील सहायक पोलीस निरीक्षक आणि भिवंडीतील दोन उपनिरीक्षकांना कोरोनाची लागण झाली. तर एसआरपीएफचे चार कॉन्स्टेबल, मुख्यालयातील दोघे त्याचप्रमाणे बदलापूर, ठाणे नियंत्रण कक्ष, शिवाजीनगर, नारपोली, चितळसर आणि वाहतूक शाखा येथील प्रत्येकी एका कर्मचाºयाला लागण झाली. त्यामुळे एकाच दिवसात चार अधिकाºयांसह १२ कर्मचाºयांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. एसआरपीएफच्या कर्मचाºयांना मरोळ पोलीस कॅम्पमध्ये तर उर्वरित कर्मचाºयांना ठाणे, नवी मुंबई, नाशिक, डोंबिवली, काल्हेर आणि भार्इंदरपाडा आदी ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.* आतापर्यंत ५५ अधिकारी आणि ४४० कर्मचारी अशा ४९५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये तिघांचा मृत्यु झाला. तर ३३ अधिकारी आणि ३०१ कर्मचारी अशा ३३४ पोलिसांनी कोरोनावर मात केली असून २२ अधिकारी आणि १३६ कर्मचारी अशा १५८ पोलिसांवर वेगवेगळया रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस