शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
2
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
3
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
4
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
5
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
6
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
7
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
8
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
10
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
11
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
12
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
13
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
14
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
15
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
16
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
17
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन
18
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
19
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
20
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना

CoronaVirus News: ‘रेडक्रॉस’मधील स्वॅब सेंटरमध्ये सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 1:29 AM

CoronaVirus News: नागरिकांची गैरसोय : उल्हासनगरात चाचणीसाठी मोठ्या प्रमाणावर होतेय गर्दी

- सदानंद नाईकउल्हासनगर : रेडक्रॉस हॉस्पिटल येथील कोरोना स्वॅब  सेंटरवर संशयित नागरिकांची स्वॅब देण्यासाठी गर्दी झाल्याचे चित्र असून त्याठिकाणी नागरिकांना बसण्याची व पाणी पिण्याची काही एक सुविधा नसल्याचे उघड झाले. नागरिकांची नाराजी दूर करण्यासाठी मूलभूत सुखसुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप पगारे यांनी दिले.  शहरात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून एकूण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारपेक्षा जास्त झाली. तर, दररोज २०० च्या आसपास कोरोना रुग्ण नव्याने मिळत आहेत. दरम्यान, नागरिकांत कोरोनाबाबत जनजागृती झाल्याने ते स्वतःहून उल्हासनगर महापालिका सेंटरवर जाऊन  चाचणीसाठी स्वॅब देत आहेत. त्यामुळे सेंटरमध्ये गर्दी होत आहे. मात्र, या स्वॅब केंद्राच्या ठिकाणी नागरिकांना बसण्याची व पाणी पिण्याची व्यवस्था नसल्याचे चित्र आहे. नागरिकांनी याबाबत तक्रारी केल्या असून त्यांना सोयीसुविधा देण्याचे आश्वासन महापालिका वैद्यकीय अधिकारी पगारे आणि डॉ. राजा रिजवानी यांनी दिले. सुटीच्या दिवशी लसीकरण सुरू ठेवामनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांनी रविवारसह अन्य सरकारी सुटीच्या दिवशीही लसीकरण प्रक्रिया सुरू ठेवण्याची मागणी महापालिकेकडे केली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जास्तीतजास्त लसीकरण करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.१३ हजार लसीकरणमहापालिकेने १३ हजार नागरिकांचे लसीकरण ३ मार्चपूर्वी केल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी दिलीप पगारे यांनी दिली. तसेच लसीकरणाची प्रक्रिया वाढविण्याचे संकेत दिले. ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण सुरू केले असून त्यांनी लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. पालिका शाळेत कोविड आरोग्य केंद्रउल्हासनगर महापालिका शाळा क्र. २८ व १४ मध्ये नव्याने आरोग्य केंद्र सुरू करण्याचे संकेत वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप पगारे यांनी दिले. तेथे ३०० पेक्षा जास्त बेड राहणार असून लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांवर उपचार केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या