शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

CoronaVirus News: सकस आहाराच्या सेवनामुळे आदिवासी कोरोनापासून कोसो दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 00:33 IST

सेंद्रिय खतांचा वापर; रानभाज्या खाण्यावर भर, आयुष्यभर कष्टाची सवय

- जनार्दन भेरेभातसानगर : मागील चार महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले असून नागरिकांचे आयुष्यच बदलून गेले आहे. घड्याळाच्या काट्यावर चालणारी शहरे एकाएकी शांत झाली, व्यवहार ठप्प झाले. परदेशांतील कोरोनाने आपल्या घरात कधी प्रवेश केला, हे कळलेसुद्धा नाही. ग्रामीण भागातही त्याने हातपाय पसरले, मात्र सुदैवाने जिल्ह्यातील आदिवासी भागांत त्याचा शिरकाव झालेला नाही, याचे कारण त्यांचा सकस आहार. यातील घटकांमुळे त्यांच्यातील प्रतिकारशक्तीने कोरोनासारख्या महामारीला दूरच ठेवले आहे.अंगमेहनत, कष्टाची सवय असल्याने शरीर मजबूत होते. शहरातील नागरिक जंकफूडपासून ते अगदी रासायनिक खतांवर पिकवलेल्या भाज्यांचे सेवन करतात. मात्र, आदिवासी हे सेंद्रिय खतांचा वापर करून पिकवलेल्या भाज्यांचा वापर जेवणात करतात. परिस्थितीमुळे ९० टक्के आदिवासींना रासायनिक खते घेणे परवडत नाही. तसेच पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्यांचा ते अधिकाधिक वापर करतात. त्या अत्यंत गुणकारी असतात. आज ही आदिवासी मंडळी भेंडी किंवा अन्य भाजीपाल्यांची लागवड ही सेंद्रिय खतांचा वापर करूनच करतात. सकस आहारामुळेच शहापूर तालुक्यातील आदिवासीपाडे हे कोरोनापासून लांब आहेत.शहरात आज लहानांपासून मोठ्यांना कोरोना होत आहे. पण, आदिवासीपाड्यांवरील मुले, त्यांचे पालक हे कोरोनामुक्त आहेत. मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर होताच तालुक्यातील आदिवासी आश्रमशाळा, वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून त्यांच्याकडे सुपूर्द केले. आज तालुक्यात मुलींची दोन, तर मुलांची सहा वसतिगृहे आहेत.प्रत्येक वसतिगृहात ७५ विद्यार्थ्यांची क्षमता असते. त्यानुसार, १५० मुली आणि ४५० मुले या वसतिगृहांत राहतात. सध्या ती बंद आहेत.ज्यावेळेस सरकार शाळा सुरू करायला परवानगी देईल, तेव्हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आम्ही तयारी केली असल्याचे सांगण्यात आले. सॅनिटायझरचा वापर तसेच विद्यार्थ्यांची आरोग्यतपासणी केली जाईल. एखादा आजारी वाटल्यास त्याला तातडीने शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले जाईल. शहरात आॅनलाइन अभ्यासक्रम शिकवला जात आहे, मात्र ग्रामीण खासकरून आदिवासी भागांत ही सोय नसल्याने शिक्षकच विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहेत. त्यांना मार्गदर्शन करत आहेत.१५ दिवसांनी होते तपासणीजेव्हा या आदिवासी शाळा सुरू असतात, तेव्हा दर १५ दिवसांनी या विद्यार्थ्यांची आरोग्यतपासणी केली जाते. त्यासाठी चार जणांच्या पथकाची नेमणूक केलेली असते. यात डॉक्टर, परिचारिका आदींचा समावेश असतो. या तपासणीत एखादा विद्यार्थी आजारी वाटल्यास त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करतात किंवा अधिक उपचाराची गरज असल्यास ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात नेले जाते. या सर्वांचा खर्च सरकार करते, असे संबंधितांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या