शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

CoronaVirus News: केडीएमटीही धावणार उद्यापासून; चार मार्गांवर सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 00:08 IST

नोकरदार, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा, एसटीचा भार होणार कमी

कल्याण : लॉकडाऊनमुळे गेली अडीच महिने कल्याण-डोंबिवलीतील सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद असलेली केडीएमटीची बससेवा गुरुवारपासून चार मार्गांवर सुरू होत आहे. त्याचा लाभ नोकरदार आणि सामान्य प्रवाशांनाही होणार आहे. तसेच या सेवेमुळे सध्याचा एसटी महामंडळावर येणारा भारही कमी होणार आहे.केडीएमटी उपक्रम लॉकडाऊनमुळे पूर्णपणे ठप्प होता. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी एकही बस आजपर्यंत धावलेली नाही. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ४० बस चालू ठेवण्यात आल्या आहेत. अनलॉक १ मध्ये एसटी बसची सुरू झालेली वाहतूक आणि त्यावर आलेला ताण पाहता परिवहन उपक्रमाच्या बस रस्त्यावर कधी धावतील, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले होते. त्यात आता रेल्वेनेदेखील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीही वाहतूकसेवा सुरू केली आहे.दरम्यान, गुरुवारपासून सुरू होणाºया केडीएमटीच्या बसमधून प्रवास करताना प्रवाशांना सोशल डिस्टन्सचे नियम पाळावे लागणार आहेत.केडीएमटीच्या ताफ्यात २१८ बस असल्या तरी वाहक आणि चालकांच्या कमतरतेमुळे ७० ते ७५ बस रस्त्यावर धावतात. उपक्रमाची सेवा महापालिका क्षेत्रासह टिटवाळा, बदलापूर, भिवंडी, अलिमघर, वाशी, कोकण भवन, पनवेल अशा एकूण ३३ मार्गांवर दिली जाते.परंतु, पहिल्या टप्प्यात उपक्रम चालू करताना कल्याणमध्ये रिंगरूट आणि मोहना परिसर तर डोंबिवलीतील लोढा हेवन आणि निवासी भागासाठीच केडीएमटीच्या बस धावणार आहेत. यामुळे सामान्यांना दिलासा मिळणार आहे.अत्यावश्यक कर्मचाºयांसाठी असलेली सेवा सुरूच राहणारकेडीएमटी सध्या कल्याण-डोंबिवलीसह लगतच्या बदलापूर, टिटवाळा, अंबरनाथ शहरातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांचीने-आण करीत आहे. केडीएमसी परिक्षेत्रांतर्गत वैद्यकीय सेवा बजावणाºया डॉक्टर आणि परिचारिकांनाही आरोग्य केंद्र आणि रुग्णालयात येणे-जाणे सोयीचे व्हावे, यासाठी विशेष बस सोडण्यात आल्या आहेत.कल्याणमधील महात्मा फुले चौक, चिकणघर, अन्सारी चौक, आंबेडकर रोड, मोहने, मांडा, तिसगाव, कोळसेवाडी तर, डोंबिवलीतील दत्तनगर, मढवी, शास्त्रीनगर, ठाकूरवाडी, पाटकर, मंजुनाथ, नेतिवली नाका, पंचायत बावडी येथील आरोग्य केंद्रांवर जाण्यासाठी डॉक्टर आणि परिचारिकांना बस उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. दरम्यान, ही सेवा सुरूच राहणार असल्याची माहिती व्यवस्थापक मारुती खोडके यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या