शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात दिवसभरात नव्या १९९५ रुग्णांची वाढ; केडीएमसीत सर्वाधिक रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 01:36 IST

ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात ४०९ नवे रुग्ण सापडले आहेत. तर चार जणांचा मृत्यू झाल्यामुळे आता मृतांची संख्या ९२२ झाली आहे.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार ९९५ रुग्णांचा शोध शुक्रवारी घेण्यात आला. या रुग्णांसह जिल्ह्यात एक लाख ५५ हजार १३४ रुग्णांची आतापर्यंत नोंद घेण्यात आली आहे. तर २९ जणांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यातील मृतांचा आकडा चार हजार ८२ वर गेला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली.ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात ४०९ नवे रुग्ण सापडले आहेत. तर चार जणांचा मृत्यू झाल्यामुळे आता मृतांची संख्या ९२२ झाली आहे. कल्याण - डोंबिवली (केडीएमसी) मनपा परिसरात सर्वाधिक ५९१ रुग्ण नव्याने आढळून आले असून, सात जणांचा मृत्यू झाला आहे. उल्हासनगरला ७१ नवे रुग्ण तर तीन मृत्यू झाला आहे. भिवंडी मनपा कार्यक्षेत्रात ३७ रुग्ण नव्याने सापडले असून, एकाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मीरा-भार्इंदर महापालिकेच्या क्षेत्रात १९२ रुग्णांसह सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.नवी मुंबईत ३६८ रुग्ण वाढलेनवी मुंबई : शहरात दिवसभरात ३६८ रुग्ण वाढले आहेत. एकूण रुग्णांची संख्या ३२३७१ झाली आहे. नवी मुंबईमध्ये दिघा वगळता इतर सातही विभागात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. तर शुक्रवारी दिवसभरात ३४५ रुग्ण बरे झाले असून उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीमध्ये ३५६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.वसई-विरारमध्ये १८५ नवे रुग्णवसई : वसई-विरार शहरात शुक्रवारी दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर नवीन बाधित रुग्णसंख्या १८५ने वाढली आहे. तर दिवसभरात २१६ रुग्ण विविध रुग्णालयांतून मुक्त झाले आहेत. सध्या शहरात २,२१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.- अंबरनाथ शहरात ५७ रुग्ण नव्याने आढळले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. बदलापूरमध्ये ९१ रुग्ण सापडले असून शुक्रवारीही एकाचाही मृत्यू झालेला नाही. ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातही १७९ रुग्णांची वाढ झाली असून, तीन मृत्यू झाले आहेत.रायगडमध्ये 615 जणांना कोरोनाची लागणअलिबाग : रायगड जिल्ह्यात शुक्रवारी ६१५ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात पनवेल महापालिका क्षेत्रात २१५, पनवेल ग्रामीणमध्ये ७५, उरण ५, खालापूर ३०, कर्जत ३४, पेण ७८, अलिबाग ५६, मुरुड ३, माणगाव २४, तळा ७, रोहा २६, सुधागड २, श्रीवर्धन ४, म्हसळा ४, महाड ३४, पोलादपूर १८ असे एकूण ६१५ रुग्ण सापडले आहेत. तर दिवसभरात एकूण ७९० रुग्ण उपचारांनंतर बरे होऊन घरी गेले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे