CoronaVirus News: भिवंडीत रुग्ण दुपट्टीचा कालावधी 130 दिवसांवर; आयुक्त पंकज आशिया यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 02:49 PM2020-08-09T14:49:40+5:302020-08-09T14:49:51+5:30

शहरात 900 ऑक्सीजन सुविधा असलेले बेड उपलब्ध असून ते सध्या रिकामे असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना त्याचा उपयोग होत आहे असे डॉ पंकज आशिया यांनी सांगितले .

CoronaVirus News: The duration of patient doubling in Bhiwandi is 130 days | CoronaVirus News: भिवंडीत रुग्ण दुपट्टीचा कालावधी 130 दिवसांवर; आयुक्त पंकज आशिया यांची माहिती

CoronaVirus News: भिवंडीत रुग्ण दुपट्टीचा कालावधी 130 दिवसांवर; आयुक्त पंकज आशिया यांची माहिती

Next

भिवंडी: राज्यात कोरोना परिस्थिती अजूनही आटोक्यात आलेली नसतांनाही भिवंडी शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणून रुग्ण दुपट्टीचा कालावधी तब्बल 130 दिवसांवर पोहचला असून ,राज्यात महानगरपालिका क्षेत्रात तो सर्वोत्तम असून भिवंडी शहरातील कोरोना संसर्गाची परिस्थिती निवळण्यात प्रशासना सोबत शहरातील नागरीक ,पोलीस यंत्रणा ,सेवाभावी संस्था ,खाजगी डॉक्टर्स संघटना या सर्वांचे प्रयत्न कारणीभूत असल्याची प्रतिक्रिया भिवंडी महानगरपालिका आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी दिली आहे .

मुंबई ,पुणे पाठोपाठ ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असताना ठाणे ,कल्याण डोंबिवली , मीरा भाईंदर ,नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्ण संख्या व मृत्यु संख्या झपाट्याने वाढत असताना जुलै महिन्याच्या उत्तरार्थत नव्याने आयुक्त म्हणून रुजू झालेले भारतीय प्रशासकीय सेवेतील डॉ पंकज आशिया यांनी अवलंबिलेल्या चार सूत्री उपाययोजना कामी आल्या असल्याने शहरातील कोरोनावर सध्यातरी नियंत्रण मिळविण्यात मनपा प्रशासनांसह आरोग्य विभागाला यश आले असल्याची माहिती मनपा आयुक्त आशिया यांनी दिली आहे.

कोरोनची परिस्थिती शहरात बिकट झाल्याने सुरुवातीला रुग्णांसाठी रुग्णालय व रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी सर्वप्रथम पाऊले उचलल्या नंतर आयजीएम या शासकीय कोव्हिडं रुग्णालयात ऑक्सीजन टॅंक उभारणी करून सर्व बेड ऑक्सीजन लाईन ने जोडले गेले तर शहरातील दोन सांस्कृतिक सभागृहात महानगरपालिका वतीने तब्बल 260 ऑक्सीजन बेड ची व्यवस्था करून दिल्यावर त्या ठिकाणी मोफत उपचार होत असल्याचा विश्वास नागरीकांमध्ये  निर्माण करण्यात महानगरपालिका प्रशासन यशस्वी झाल्याने रुग्ण स्वतःहून तपासणी साठी पुढे आले.

शहरात सुरू केलेल्या 30 मोहल्ला क्लिनिक कडून मोहल्ल्या मोहल्ल्यात तर शिक्षक व महानगरपालिका कर्मचारी यांच्या 478 पथकांकडून घरोघरी जाऊन केलेल्या सर्वेक्षणात अनेक संशयित रुग्ण आढळून आल्यानंतर तात्काळ त्यांची तपासणी तर त्यांच्या निकट संपर्कातील व्यक्तींना आरोग्य विभागाने अलगिकरण केल्याने कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यात प्रशासनास यश मिळाले असून सध्या शहरात कोविड रुग्णालयातील 90 टक्के बेड रिकामे असून शहरात 900 ऑक्सीजन सुविधा असलेले बेड उपलब्ध असून ते सध्या रिकामे असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना त्याचा उपयोग होत आहे असे डॉ पंकज आशिया यांनी सांगितले .

भिवंडी शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यात मालेगाव पॅटर्न अथवा मालेगाव काढा यांचा सहभाग किती या बाबत बोलताना डॉ पंकज आशिया यांनी कोरोना ला अटकाव फक्त प्रशासन करू शकत नसून राज्य केंद्र शासनाच्या आरोग्य विभागा कडून दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करीत असताना भिवंडी शहरातील नागरीकांचे सहकार्य ,धार्मिक गुरू ,स्वयंसेवी संस्था ,पोलीस प्रशासन व इंडियन मेडिकल असोसिएशन चे डॉक्टर्स मंडळीं या सर्वांचे मोलाचे सहकार्य मिळत असताना महानगरपालिका कर्मचारी यांनी घेतलेली दिवसरात्र मेहनत या सर्वांच्या सामुहीक प्रयत्नातून आपण भिवंडी शहरातील कोरोना परिस्थितीती आटोक्यात आणण्यात यशस्वी झालो आहोत अशी प्रतिक्रिया आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी दिली.

 कोरोना काळात खाजगी रुग्णालयातून रुग्णाची उपचार करताना आर्थिक पिळवणूक केली गेली असल्याची संपूर्ण राज्यात ओरड होत असताना आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी शहरातील सहा खाजगी किविड रुग्णालयात रुग्णांकडून वसूल केलेल्या बिलाची चौकशी टास्क फोर्स तर्फे करण्यात आली असून त्या बाबत संबंधित रुग्णालयां कडून खुलासा मागविल्या नंतर अनावश्यक असलेल्या बिलांचा परतावा संबंधित रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना देण्या बाबत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देखील डॉ पंकज आशिया यांनी दिली आहे.  

Web Title: CoronaVirus News: The duration of patient doubling in Bhiwandi is 130 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.