शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : कोरोना रिपोर्टच्या प्रतीक्षेत कल्याणच्या विवाहितेचा मृत्यू, चार दिवस उलटूनही रिपोर्ट नाहीच

By जितेंद्र कालेकर | Updated: June 25, 2020 00:51 IST

उशिरा अहवाल मिळाल्यामुळे कोविड रुग्णालयात हलविण्यापूर्वीच तिचा सोमवारी मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या पतीने केला आहे.

जितेंद्र कालेकर ठाणे : श्वास घेण्यास त्रास झालेल्या कल्याणच्या एका २६ वर्षीय विवाहितेवर ठाण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू होते. चार दिवस प्रतीक्षा करुनही तिचा कोरोनाचा अहवाल आलाच नाही. उशिरा अहवाल मिळाल्यामुळे कोविड रुग्णालयात हलविण्यापूर्वीच तिचा सोमवारी मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या पतीने केला आहे.कल्याणच्या खडकपाडा येथे राहणाऱ्या या विवाहितेला श्वसनाबरोबरच किडनीचा त्रास होता. तसेच तिला तापही आला होता. त्यामुळे ती रुक्मिणीबाई रुग्णालयात पतीसह १७ जून रोजी गेली होती. तिथे तिची प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार तिला बुधवारी रात्री ८ वाजता ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. १८ जून रोजी तिला पहाटेच्या सुमारास अतिदक्षता विभागात दाखल केले. त्याचदिवशी सकाळी कोरोना तपासणीसाठी तिचा स्वॅब घेण्यात आला. मात्र, तीन दिवस उलटूनही केवळ पत्ता वेगळा असल्याचे कारण दाखवत तिचा अहवालच देण्यात आला नाही. अखेर २० जून रोजी कुटुंबीयांच्या आग्रहानंतर तिचा पुन्हा स्वॅब घेण्यात आला. याच काळात तिला डायलेसिसचीही गरज असताना केवळ रिपोर्टअभावी डायलेसिसही करण्यात येत नव्हते. मात्र, प्रकृती गंभीर होत चालल्याने, शिवाय हिमोग्लोबिन कमी असल्याने तिचे डायलेसिस करण्यात आले. दरम्यान, दुसऱ्यांदा घेतलेल्या स्वॅबचा अहवाल २२ जून रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पॉझिटिव्ह आला. तिला अन्यत्र कोविड रुग्णालयात दाखल करण्याचा सल्लाही या रुग्णालयातून देण्यात आला. मात्र ११.४० वाजण्याच्या सुमारास तिचा  मृत्यू झाला. 

अहवाल वेळेत, किमान दुसऱ्या दिवशी मिळाला असता, तरी तिला तातडीने ठाण्यातील अन्य कोविड रुग्णालयात दाखल करता आले असते. वेळेत अहवाल न मिळाल्याने आधीच गंभीर आजारी असलेल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप पतीने केला आहे. यासदंर्भात रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. प्रतिभा सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्या उपलब्ध होऊ शकल्या नाही.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या