शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : कोविड रुग्णालयातील व्हेंटिलेटर शोभेसाठी, रुग्णांवर होत नाहीत उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 00:54 IST

या ठिकाणी योग्य उपचार मिळत नसल्याने ते खाजगी रुग्णालयात उपचारासाठी निघून जात आहेत. तर, दुसरीकडे या रुग्णालयातील दोन व्हेंटिलेटर हे केवळ शोभेसाठी असल्याचे समोर आले आहे.

पंकज पाटील अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेने मोठा गाजावाजा करून उभारलेले ७०० खाटांचे रुग्णालय रुग्णांना सेवा देण्यात अपुरे पडत आहे. श्वसनाचा त्रास होणाऱ्या रुग्णांना या ठिकाणी योग्य उपचार मिळत नसल्याने ते खाजगी रुग्णालयात उपचारासाठी निघून जात आहेत. तर, दुसरीकडे या रुग्णालयातील दोन व्हेंटिलेटर हे केवळ शोभेसाठी असल्याचे समोर आले आहे.अंबरनाथ पालिकेने डेंटल कॉलेजमध्ये कोविड रुग्णालय उभारले आहे. मात्र, या रुग्णालयाची अवस्था पाहता तेथे केवळ लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार होऊ शकतात ही बाब समोर आली आहे. बहुसंख्य डॉक्टर हे शिकावू असल्याने त्यांच्याच भरवशावर हे रुग्णालय सुरू आहे. एमबीबीएस डॉक्टर मिळत नसल्याने पालिकेने शहरातील डॉक्टरांना रुग्णालयात सेवा देण्याची विनंती केली होती. त्यानुसार काही डॉक्टर सेवाही देत आहेत. मात्र ही सेवाही अपुरी पडत आहे. काही रुग्णांना श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना आॅक्सिजन कक्षात ठेवणे गरजेचे आहे आणि त्यांची योग्य देखरेखही करणे गरजेचे आहे. मात्र या ठिकाणी योग्य नियोजन होत नसल्याने अजूनही या रुग्णालयावर नागरिकांचा विश्वास बसलेला नाही.श्वसनाचा त्रास जाणवणारे रुग्ण थेट या रुग्णालयांमधून बाहेर पडत आहेत. एका महिन्याच्या आतच पालिकेने हे कोविड रुग्णालय उभारले होते. मात्र ते चालविण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा अजूनही रूळावर आलेली नाही.>रुग्णाकडे होते दुर्लक्षया रुग्णालयात एक कोरोनाग्रस्त रुग्ण दाखल झाल्यावर लागलीच त्याला दुसºया दिवशी श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्याने डॉक्टरांना याची कल्पना दिली. मात्र, डॉक्टरांनी त्याकडे सोयीने दुर्लक्ष केले. अखेर, त्या रुग्णाने पालिकेच्या रुग्णालयात उपचार न घेता खाजगी रुग्णालयाचा मार्ग अवलंबला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या