शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Coronavirus News: ठाण्यातील मृतदेहांची अदलाबदल प्रकरणी अखेर आयुक्तांचा जाहीर माफीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 22:23 IST

ठाण्यातील मृतदेहांच्या बदलाबदल प्रकरणी महापालिका आयुक्त डॉ. विपीन सिंग यांनी गायकवाड आणि सोनवणे कुटूंबियांची जाहीर माफी मागितली असून यापुढे दुर्दैवाने कोणाचा मृत्यू झालाच तर ओळख पटवूनच संबंधितांना मृतदेह ताब्यात दिले जाणार आहे. दरम्यान, याप्रकरणी दोषी असलेल्या चार परिचारिकांसह एका डॉक्टरवर बडतर्फीची तर अन्य एका डॉक्टरवर बदलीची कारवाई केल्याचीही माहिती आयुक्तांनी दिली.

ठळक मुद्देदोषी असलेल्या एकाची उचलबांगडी तर दुसऱ्या डॉक्टरवर बडतर्फीची कारवाई चार परिचारिकांनाही केले बडतर्फओळख पटवूनच दिला जाणार मृतदेहाचा ताबा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातील ग्लोबल हब रुग्णालयातील कोराना रुग्णांच्या मृतदेह अदलाबदल प्रकरणी पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सोनवणे आणि गायकवाड कुटूंबियांची जाहिर माफी मागितली. याप्रकरणी कोविड रुग्णालयाचे डॉ. योगेश शर्मा यांची बदली करून चार परिचारिकांना निलंबित केले आहे. याशिवाय यापुढे ओळख पटवूनच मृतदेह ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त शर्मा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.गेल्या संपूर्ण एक आठवड्यापासून सुरू असलेल्या मृतदेह अदलाबदल प्रकरणावर महापालिका तसेच राजकीय वर्तुळातून टीकेची झोड उठविण्यात आली. राज्यपाल डॉ. भगतसिंह कोश्यारी यांनीही याप्रकरणी कारवाईचे संकेत भाजपासह सोनवणे आणि गायकवाड कुटूंबियांना गुरुवारी दिले. त्यापाठोपाठ आयुक्तांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करून दिलगिरी व्यक्त करण्याबरोबरच वैद्यकीयदृष्टया पालिकेची कोणतीही चुक नसल्याचीही सारवासारव केली. तांत्रिकदृष्टया हा प्रकार घडल्यामुळे संबंधितांवर आपण कारवाई करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यानुसार अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा यांची अन्यत्र बदली केली असून त्यांच्या जागी डॉ. अनिरु द्ध माळगावकर यांना नेमले आहे. यापुढे मात्र, आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून रुग्ण व्यवस्थापनामध्ये कोणतीही चूक होणार नाही. याची पालिका प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाणार आहे.* रुग्णाच्या फाईलवर त्याचे छायाचित्र लावणारकोणत्याही रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्या फाईलवर दर्शनी भागात त्याचे छायाचित्र लावले जाणार आहे. तसेच डिजिटल हँड ब्रँड प्रक्रियादेखील सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे उपचार करतांना किंवा दुर्दैवाने मृत्यू झालाच तर अदलाबदल सारखे प्रकार होणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले............................मृत्यूदर कमी करण्यावर भरऔषधांबरोबर काही इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे बोलले जात असल्याबाबतच्या प्रश्नावर आयुक्त डॉ. शर्मा म्हणाले, सध्या तरी पुरेसा औषधांचा साठा आहे. शहरातील कंटेनमेंट झोनमध्ये अत्याधुनिक यंत्रणेद्वारे घरोघरी जाऊन कर्मचाऱ्यांमार्फत सर्व्हेक्षण केले जात आहे. यात नागरिकांचे ताप, आॅक्सिजनचे प्रमाणही तपासले जात असल्यामुळे त्याचा चांगला परिणाम जाणवू लागला असल्याचे त्यांनी सांगितले. जास्तीत जास्त तपासण्या करून कोरोनाग्रस्तांची वाढती आकडेवारी समोर येत असली तरी रुग्ण बरे करण्यावर आणि मृत्यूदर कमी करण्यावर आपला भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी पालिका आयुक्तांपासून कर्मचाºयापर्यंत सर्वच अधिकारी कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकारी कर्मचारी वर्ग मेहनत घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी काही आकडेवारी सादर करूनमहापालिकेने कोविड रुग्णांसाठी तसेच रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या कामाचीही माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसtmcठाणे महापालिका