शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कर्मचाऱ्याचे कोरोनाने निधन; भिवंडी मनपाच्या दुर्लक्षीत कारभारामुळे मृत्यू झाल्याचा कामगार संघटनेचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 18:19 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : सुरेश जाधव हे मनपा मध्ये १९८५  मध्ये सफाई कामगार म्हणून रुजू झाले होते.

नितिन पंडीत

भिवंडी - भिवंडी मनपाचे सफाई कर्मचारी सुरेश रामा जाधव (वय ५५ वर्ष ) यांचे कोरोना आजाराने रविवारी निधन झाले आहे. युवा कवी मिलिंद जाधव यांचे ते वडील होते. त्यांच्या पच्छात त्यांची पत्नी, ३ मुलं, २ सुना, २ भाऊ, ४ बहिणी, ३ नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान कोरोना संकटात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेबाबत मनपा प्रशासन उदासीन असल्याने कामगारांचा मृत्यू होत असून कामगारांची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळें महागडे उपचार घेणे मनपा कामगारांना शक्य नसल्याने त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागत असून जाधव यांच्या मृत्यूने कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ माजली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. 

सुरेश जाधव हे मनपा मध्ये १९८५  मध्ये सफाई कामगार म्हणून रुजू झाले होते. प्रभाग समिती ५ अंतर्गत कॅबिन क्रमांक १३,  वार्ड क्र. पाच  ड मध्ये सफाई कामगार म्हणून सध्या कार्यरत होते. गेल्या ३६ वर्ष त्यांनी आपली प्रामाणिक सेवा महानगर पालिकेला दिली आहे. त्यांच्या अचानकपणे कोरोनाचा विळख्यात जाण्याने मनपा कर्मचाऱ्यात हळहळ व्यक्ती केली जात आहे. सुरेश जाधव यांना मनपाच्या खुदा बक्ष हॉल येथील कोविड सेंटरमध्ये दाखल केले होते परंतु तेथे त्यांच्यावर योग्य उपचार न झाल्याने त्यांना मृत्यूला बळी पडावे लागले असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढली असून मृत्युदर देखील वाढले आहे. दरम्यान मनपा सफाई कामगारांना कोरोना संकटात आवश्यक साधन सामुग्री देण्याची मागणी विविध पक्ष, संघटना व कामगार युनियन यांनी वेळोवेळी केली असून मनपा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करून आजही कामगारांना अत्यावश्यक साधन सामुग्री दिली नसल्यानेच मनपाचे सफाई कामगार सुरेश जाधव यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप लेबर फ्रंट युनियनचे सरचिटणीस संतोष चव्हाण यांनी केला आहे.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याbhiwandiभिवंडी