शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार: मुंबईच्या वितरकाचा अटकपूर्व जामीन ठाणे न्यायालयाने फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 19:23 IST

कोरोनाच्या भीषण परिस्थितीचा गैरफायदा घेत कोरोनावरील रेमडिसिवीर आणि टोकलीझुमॅब या इंजेक्शनचा काळाबाजार करणारा मुंबईतील वितरक प्रविण जैन याचा अटकपूर्व जामीन ठाण्याचे सत्र न्यायाधीश ए. एस. पंढरीकर यांनी नुकताच फेटाळला आहे.

ठळक मुद्देरेमडिसिवीर आणि टोकलीझुमॅब इंजेक्शनची चढया दराने विक्रीपाच आरोपींना यापूर्वीच ठाणे पोलिसांनी केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यात अनेकांचे मृत्यु ओढवले आहेत. नेमकी याच परिस्थितीचा गैरफायदा घेत कोरोनावरील रेमडिसिवीर आणि टोकलीझुमॅब या इंजेक्शनचा काळाबाजार करणारा मुंबईतील वितरक प्रविण जैन याचा अटकपूर्व जामीन ठाण्याचे सत्र न्यायाधीश ए. एस. पंढरीकर यांनी नुकताच फेटाळला आहे. सध्याच्या परिस्थितीचा तो गैरफायदाही घेऊ शकतो, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले.रेमडिसिवीर आणि टोकलीझुमॅब इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने यापूर्वीच पाच जणांना अटक केली आहे. कोणत्याही बिलाशिवाय जैन याच्याकडूनच ही इंजेक्शन घेतल्याची बाब ठाणे खंडणी विरोधी पथकाने या पाच जणांकडे केलेल्या चौकशीत उघड झाली आहे. जैन याने ही औषधे किती जणांना विक्री केली? ती खरी आहेत की बनावट? याचाही शोध घेतला जावा. तसेच जैन यालाही अटक केली जावी, असेही आदेश ठाणे न्यायालयाने शनिवारी दिले.कोरोनावर बऱ्यापैकी गुणकारी ठरत असल्यामुळे रेमडिसिवीर आणि टोकलिझुमॅब या इंजेक्शनच्या मागणीतही मोठया प्रमाणात वाढ झाली. त्याचवेळी दुसरीकडे या औषधांच्या काळयाबाजारालाही मोठया प्रमाणात सुरुवात झाली. चढया दराने या औषधांची विक्री होत असल्यामुळे मुंबईसह ठाणे पोलिसांनीही अशा काळाबाजार करणाऱ्यांचे अटकसत्र सुरु केले. ठाणे खंडणी विरोधी पथकाने जुलैमध्ये अरु ण सिंग, सुधाकर गिरी, रवींद्र शिंदे, वसीम अहमद अब्दुल अहमद शेख आणि अमतिाभ दास या पाच आरोपींना अटक केली. त्यांच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. या आरोपींकडून रेमडिसिविर आणि टोकलिझुमॅबसह इतरही औषधे जप्त करण्यात आली होती. याच आरोपींच्या चौकशीत मुंबईच्या वडाळा येथील वितरक जैन याचे नाव समोर आले. आरोपींनी जैन याच्याकडून ही औषधे बेकायदा विनाबिल घेतले. तसेच कोरोनाबाधित रुग्णांना ही औषधे मुळ किंमतीपेक्षा जादा दरानरे विक्री केली.जैन याच्या वडाळा येथील कार्यालयावर धाड टाकूनही तो ठाणे खंडणी विरोधी पथकाच्या हाती लागला नाही. पुरावे नष्ट होऊ नये म्हणून पोलिसांनी त्याचे कार्यालय देखिल सील करुन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मात्र, भूमीगत राहून त्याने अटकपूर्व जामिनासाठी ठाणे न्यायालयात अर्ज केला. याच अर्जाच्या सुनावणीच्या वेळी सरकारी वकील संजय मोरे यांनी त्याला जामीन मिळू नये यासाठी न्यायालयात जोरदार बाजू मांडली. अ‍ॅड. मोरे आणि तपासी अधिकाºयांचे मुद्दे गृहित धरुन त्याचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. आरोपीला जामीन मिळावा, अशी मागणी त्याच्या वकीलांनी केली. मात्र, जामीन मिळाल्यानंतर तो सध्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊ शकतो. त्यामुळेच त्याला जामीन देता येणार नाही, असे मत न्यायालयाने यावेळी नोंदविले.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCrime Newsगुन्हेगारी