शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
6
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
7
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
8
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
9
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
10
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
11
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
12
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
13
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
14
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
15
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
16
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
17
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
18
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
19
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
20
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...

Coronavirus News: लॉकडाऊनचे नियम तोडणाऱ्या एक हजार ६१७ वाहन चालकांवर कारवाई: २६२ वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 22:14 IST

वारंवार प्रशासनाकडून आवाहन करण्यात येऊनही लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करीत सर्रास विनाकारण घराबाहेर पडणा-या एक हजार ६१७ वाहन चालकांवर ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने शुक्रवारी देखिल कारवाईचा बडगा उगारला. त्यांच्याकडून सात लाख ३५ हजार ४०० रुपयांचा दंड ई चलनाद्वारे वसूल केला आहे.

ठळक मुद्देठाणे शहर वाहतूक नियंत्रण शखेची कारवाईसात लाख ३५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: लॉकडाऊनच्या नियमांची पायमल्ली करणा-या एक हजार ६१७ वाहन चालकांवर ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने शुक्रवारी देखिल कारवाईचा बडगा उगारला. त्यांच्याकडून सात लाख ३५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर २६२ वाहने शुक्रवारी सायंकाळपर्यंत जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर अशा चार विभागातील १८ युनिटच्या पथकांनी ही कारवाई केली. अत्यावश्यक तसेच वैद्यकीय कामाव्यतिरिक्त विनाकारण फिरणा-या तसेच जादा प्रवाशांची वाहतूक करणाऱ्यांवर ३ जुलै रोजी कारवाई करण्यात आली. यामध्ये सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत ठाणे महापालिका क्षेत्रात ६८० वाहन चालकांकडून तीन लाख १९ हजार ७०० रुपयांचा दंड ई चलनाद्वारे वसूल करण्यात आला. तर भिवंडीमध्ये ५४० वाहने दोन लाख २७ हजार १०० रुपयांचा दंड, कल्याण डोंबिवलीमध्ये १८७ वाहने- ९२ हजार ५०० रुपयांचा दंड, अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदेच्या क्षेत्रात ११९ वाहने- ५३ हजार ७०० रुपयांचा दंड तर उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील ९१ चालकांकडून ४२ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान, ३ जुलै रोजी संपूर्ण दिवसभरात वाहतूकीचे तसेच सोशल डिस्टसिंगचे नियम न पाळणा-या २६२ चालकांची वाहने जप्त करण्यात आली. यामध्ये १७७ मोटारसायकली, ६८ रिक्षा आणि १७ मोटारकारचा समावेश आहे. नारपोलीमध्ये सर्वाधिक ३५, वागळे इस्टेटमध्ये २४ तर कोळशेवाडीमध्ये १८  दुचाकी जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेtraffic policeवाहतूक पोलीसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस