शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात २७ कोरोना रुग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 03:36 IST

तसेच दिवसभरात जिल्ह्यात २७ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शनिवारी १०४६ नवे रुग्ण सापडल्यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. तसेच दिवसभरात जिल्ह्यात २७ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांचा आकडा २०,५६६ तर, मृतांची संख्या ६८४ झाली आहे. कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात शनिवारी सर्वाधिक २४३ रुग्णांसह दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. येथील बाधितांची संख्या ३,२५८, तर मृतांची संख्या ७१ झाली. ठाणे महापालिका हद्दीत १७६ नवे रुग्ण सापडले, तर सहा जणांचा मृत्यू झाला. येथील एकूण बाधितांची संख्या ६,१३२ तर, मृतांची संख्या १९८ वर गेली आहे. नवी मुंबईत १७२ रुग्णांची, तर दहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांची संख्या चार हजार ६८७, तर मृतांची संख्या १५७ वर पोहोचली. भिवंडी पालिका क्षेत्रात ८१ नव्या बाधितांसह दोन जणांचा मृत्यू झाला. येथील एकूण बाधित संख्या ८७५ तर, मृतांची संख्या ६६ झाली आहे. तर मीरा-भार्इंदरमध्ये १३६ रुग्णांसह चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली. या क्षेत्रात २,१५२ एकूण बाधित, तर मृतांची संख्या १०३ झाली.उल्हासनगरमध्ये ५५ रुग्णांची नोंद झाली. तर एकाचा मृत्यू झाला. येथील एकूण बाधित संख्या एक हजार ५ तर, मृतांची संख्या ३० झाली आहे. अंबरनाथमध्ये १३१ रुग्णांची, तर एकाच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या १,१२०, तर मृतांची संख्या २४ झाली आहे. बदलापूरमध्ये २६ रुग्णांची नोंद केल्याने बाधितांची संख्या ५२७ झाली आहे.>ग्रामीण भागातही वाढग्रामीण भागातही रुग्णांची संख्या वाढत आहे. ठाणे ग्रामीण भागात शनिवारी २६ नवे रुग्ण सापडले. तर एकाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८१०, तर २४ जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस