शहरं
Join us  
Trending Stories
1
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
2
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
3
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
4
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
5
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
6
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
7
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
8
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
9
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
10
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
11
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
12
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
13
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
14
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
15
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
16
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
17
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!
18
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
19
फायदेच फायदे! साखर नसलेला चहा आरोग्यासाठी गुणकारी, वजन कमी करण्यासाठी प्रभावी
20
ठरलं! 'या' तारखेला टीम इंडियाला मिळणार Asia Cup ट्रॉफी; पण नक्वी यांनी पुन्हा ठेवली खास अट

CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी १२६८ कोरोना रुग्णांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 04:38 IST

४६ मृत्यू : आरोग्य विभागाची माहिती

ठाणे : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांमध्ये शुक्रवारी एक हजार २६८ रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या एक लाख चार हजार ७० झाली असून ४६ जणांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात दोन हजार ९७१ मृत्यूंची नोंद आतापर्यंत झाली आहे.ठाणे मनपाच्या क्षेत्रात शुक्रवारी २११ नवे रुग्ण सापडल्यामुळे शहरात आता २२ हजार ९३४ रुग्णांची नोंद झाली. तर, आठ जणांच्या मृत्यूने मृतांची संख्या ७२९ वर गेली आहे. कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात २६५ रुग्ण नव्याने आढळून आले. तर, सात जणांचा मृत्यू झाला बाधितांचा आकडा २३ हजार ८१२ वर पोहोचला आहे. नवी मुंबईत शुक्रवारी ३७३ नव्या रुग्णांची नोंद झाली असून सहा रुग्ण दगावले आहेत. आता बाधितांची संख्या २० हजार १३० तर मृत्यूची संख्या ४९९ झाली आहे. उल्हासनगरला नव्याने ४० रुग्ण आढळल्याने बाधितांचा आकडा सात हजार २९८ झाला आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात १३ नवे रुग्ण सापडले. तर, दोन मृत्यूंची नोंद झाली. या शहरात आजपर्यंत तीन हजार ८५५ बाधितांची तर २६८ मृतांची नोंद झाली आहे. मीरा-भाईंदरमध्ये १५० रुग्णांची तर १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. या शहरात आता बाधित १० हजार ३९२ तर मृतांचा आकडा ३४७ झाला आहे. अंबरनाथला ३२ रुग्ण नव्याने वाढले, तर एकही मृत्यू झाला नाही. बदलापूरमध्ये ५९ रुग्ण वाढले. बाधित रुग्ण तीन हजार ३३५ झाले आहेत.रायगडमध्ये ४४६ नवे रु ग्णअलिबाग : रायगड जिल्ह्यात शुक्रवार १४ आॅगस्ट रोजी ४४६ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधित रु ग्णांची संख्या २० हजारवर पोहोचली आहे. त्यापैकी १६ हजार ५४२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी दिवसभरात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात १३०, पनवेल ग्रामीणमध्ये ५३, उरण ४२, खालापूर ३६, कर्जत १८, पेण २५, अलिबाग ४९, मुरुड २, माणगाव २०, तळा २, रोहा १२, सुधागड ३, श्रीवर्धन१३, महाड ४१असे एकूण ४४६ रुग्ण सापडले आहेत. दिवसभरात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात एकूण ३६२ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. तर दिवसभरात २१ रुग्णांचा मृत्यू झाला.वसई-विरारमध्ये २८३ रुग्ण कोरोनामुक्तवसई -विरार शहरात शुक्र वारी कोरोनाचे १६७ रूग्ण आढळून आले. तर वसई, नालासोपारा व विरारमध्ये पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात २८३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आल्याची दिलासादायक माहिती महापालिकेने दिली.शुक्र वारी वसई-विरार शहर महापालिका हद्दीत १६७ कोरोना रुग्ण आढळले असून बाधित रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ३२४ वर पोहोचली आहे. सध्या विविध रुग्णालयांमध्ये दोन हजार ५४६ रुग्ण उपचार घेत आहेत.दरम्यान, नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये वसई ५७, वसई-विरार १, नायगाव ५, नालासोपारा ३६ आणि विरार ६८ यांचाा समावेश आहे. यात ९६ पुरुष, तर ७१ महिला आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ११ हजार ४७५ झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या