शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: मुस्लिमांनी केले ‘तिच्या’वर अंत्यसंस्कार; लॉकडाऊनच्या काळात घडले माणुसकीचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 01:31 IST

कलवार यांची दोन मुले परदेशात राहतात, तर एक मुलगा नाशिक येथे राहतो. दोन मुले त्यांच्यासोबत राहतात. प्रभा कलवार या आजारी होत्या.

कल्याण : हृदयविकाराच्या आजाराने ७० वर्षी प्रभा कलवार यांचा मृत्यू झाला. कलवार यांच्या मुलांनी शेजाऱ्यांना हाक दिली. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे पुढे आले नाहीत. अखेर, मुलाच्या मदतीला त्याचे मुस्लिम समाजातील मित्र धावून आले. मुस्लिमांच्या मदतीने कलवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यामुळे लॉकडाउनच्या काळात माणुसकीचे दर्शन घडले.

कलवार यांची दोन मुले परदेशात राहतात, तर एक मुलगा नाशिक येथे राहतो. दोन मुले त्यांच्यासोबत राहतात. प्रभा कलवार या आजारी होत्या. त्या भोईवाडा येथे राहत होत्या. पहाटे तीन वाजता त्यांची प्रकृती बिघडली. यावेळी त्यांच्या मुलांनी मदतीसाठी शेजाऱ्यांना हाक दिली, मात्र त्यांना शेजाºयांकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. कोरोनाच्या भीतीमुळे कोणीही पुढे आले नाही. कलवार या पूर्वी रोहिदासवाड्यात राहत होत्या. तेथे त्यांच्या मुलांचे काही मुस्लिम मित्र होेते. सध्या रमजान सुरू असल्याने मुस्लिम बांधव पहाटेच उठतात. त्यांना रोझाची तयारी करावी लागते. कलवार यांच्या मुलाचा मित्र शाकीर शेख यांना समजले की मित्राच्या आईची प्रकृती खालावली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी त्यांनी भोईवाड्यात धाव घेतली. शाकीर यांनी त्यांचे मित्र पप्पू शेख, तौसिफ बागवान, सलमान शेख, कमरुद्दीन शेख, फारीख बिजापूर यांच्या मदतीने रिक्षा करून कलवार यांना रुग्णालयात नेले. रुग्णालयात नेण्यापूर्वीच कलवार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.सोशल डिस्टन्सिंगचे पालनकलवार यांचा मृतदेह घरी नेल्यावर त्यांच्या अंत्यविधीची तयारी केली. हिंदू समाजात अंत्यविधी कसा केला जातो, हे जाणून घेतले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत बैलबाजार स्मशानभूमीत कलवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. रजजानच्या महिन्यात शाकीरसह त्यांच्या मुस्लिम बांधवांनी माणुसकीचा धर्म जपला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस