शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown: मृताच्या कुटुंबीयांना मदत करण्यास शेजाऱ्यांचा नकार; मुस्लिम बांधवांनी केले अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 15:19 IST

लॉकडाऊनच्या काळात माणुसकीचे दर्शन

कल्याण: ह्रदयविकारामुळे वयाच्या 70 व्या वर्षी प्रभा कलवार यांचा मृत्यू झाला. कलवार यांच्या मुलांनी शेजाऱ्यांना हाक दिली. मात्र शेजारी कोरोनाच्या भीतीपोटी पुढे आले नाहीत. अखेरीस मुलाच्या मदतीला त्याचे मुस्लिम समाजातील मित्र धाव आले. मुस्लिमांच्या मदतीने कलवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात माणुसकीचे दर्शन घडले. 

कलवार यांची दोन मुले परदेशात वास्तव्याला आहे. एक मुलगा नाशिक येथे राहतो. दोन मुले त्यांच्यासोबत राहतात. कलवार या आजारी होत्या. त्या भोईवाडा येथे राहत होत्या. पहाटे तीनच्या सुमारास त्यांची प्रकृती बिघडली. यावेळी त्यांच्या मुलांनी मदतीसाठी शेजाऱ्यांना हाक दिली. मात्र शेजाऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. कोरोनाच्या भीतीपोटी कोणीही पुढे आले नाही. कलवार या पूर्वी रोहिदास वाड्यात राहत होत्या. त्याठिकाणी त्यांच्या मुलांचे काही मुस्लिम मित्र होते. सध्या रमजान सुरु असल्याने मुस्लिम बांधव पहाटेच उठतात. त्यांना रोझाची तयारी करावी लागते. कलवार यांच्या मुलाने आईची प्रकृती खालावल्याचे मित्र शाकीर शेख यांना कळवले. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी त्यांनी भोईवाड्यात धाव घेतली. शाकीर यांनी त्यांचे मित्र पप्पू शेख, तौसिफ बागवान, सलमान शेख, कमरुद्दीन शेख, फारीख बीजापूर यांच्या मदतीने रिक्षा करुन कलवार यांना रुग्णालयात नेले. रुग्णालयात नेण्यापूर्वीच कलवार यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. कलवार यांचा मृतदेह घरी नेल्यावर त्यांच्या अंत्यविधीची तयारी केली. हिंदू समाजात अंत्यविधी कसा केला जातो हे जाणून घेतले. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत बैलबाजार स्मशानभूमीत कलवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. रजझानच्या पवित्र महिन्यात शाकीरसह त्यांच्या मुस्लिम बांधवांनी माणुकीचा धर्म जपला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या