शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
4
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
5
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
6
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
7
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
8
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
9
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
10
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
11
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
12
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
13
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
14
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
15
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
16
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
17
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
18
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
19
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
20
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना

CoronaVirus Lockdown : सलून व्यवसायावर गदा, आता महिनाभर केस-दाढी घरातच, मिनी लाॅकडाऊनचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 23:55 IST

CoronaVirus Lockdown : पालघर जिल्ह्यात ग्रामीण भागात ५०० सलून असून, शहरी भागात २,१०० सलून आहेत. यात मोठ्या प्रमाणात कामगार काम करतात.

- सुनील घरत

पारोळ : पूर्वी पारंपरिक पद्धतीने होत असलेल्या सलून व्यवसायाने आता कात टाकली आहे. मात्र, ‘हातावर पोट’ अशीच या व्यवसायाची ओळख असून, कोरोनामुळे निर्बंधाचे लागलेले ग्रहण सुटत नसल्याने आता आम्ही पोट कसे भरायचे? असा प्रश्न या व्यावसायिकांसमोर आहे. असेच निर्बंध राहिल्यास यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्याने प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध घालत ३० तारखेपर्यंत सलून बंद राहणार असल्याचे नमूद केले आहे. यामुळे आता नागरिकांना घरातच महिनाभर केस, दाढी करावी लागणार आहे. पालघर जिल्ह्यात ग्रामीण भागात ५०० सलून असून, शहरी भागात २,१०० सलून आहेत. यात मोठ्या प्रमाणात कामगार काम करतात. या सलून व्यवसायावर या कामगारांची चूल पेटते, पण आज हजारो कामगारांचा रोजगार बुडाला आहे. मागील वर्षी लाॅकडाऊनमध्ये हा व्यवसाय सहा महिने बंद होता. यात सर्वात शेवटी सलून व्यवसाय सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली होती. लॉकडाऊनमध्ये या व्यावसायिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. यात कर्जाचा भार सहन न झाल्याने, महाराष्ट्रात २१ व्यावसायिकांनी आत्महत्या केली होती, पण सरकारने या व्यावसायिकांसाठी बंद काळात कोणत्याच प्रकारे मदत न केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हा व्यवसाय अगदी दोन-तीन महिन्यांपूर्वीच अटी-नियम पाळून सुरू झाला होता, मात्र पुन्हा महिनाभर बंद करण्याची वेळ आल्याने त्यांच्यासमोर आता जगण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे.

बंद असल्याने कसा भागवायचा खर्च?शहरातील, तसेच ग्रामीण भागातील बहुतांश दुकाने भाड्याच्या गाळ्यात असून, त्यांना महिन्याला भाडे भरावे लागते. यात जागा मालक सूट देत नाही. व्यवसाय बंद असल्याने भाडे कसे भरायचे, हा प्रश्न आहे. त्यात वीजबिल, पाणीपट्टी यासाठीही पैसा लागणार आहे. बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित होतो. व्यवसाय बंद असल्याने साहित्यही वाया जाते. असाच जर आमचा धंदा बंद राहिला, तर पुढे हा व्यवसाय कसा करायचा, हा प्रश्न आहे.

वेळेचे बंधन घालण्यात व आठवड्यातून दोन दिवस लॉकडाऊन करण्यास आमचा विरोध नाही, पण महिनाभर दुकान बंद करून कर्जाचा भार सहन करणे आम्हाला अशक्य आहे.- सत्यवान सापणे, सलून व्यावसायिक 

सलून बंद असेल, तर कामगार व त्याचे कुटुंब जगणार कसे, याचा विचार शासनाने केला नाही. आता या निर्णयामुळे आमचे जगणे कठीण झाले आहे. यात शासनाने विचार करावा.- संतोष साने, सलून व्यावसायिक  

लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले असून, शासनाने कोणतीही मदत त्यांना दिली नाही. यामुळे अनेकांनी आत्महत्याही केल्या, पण आता पुन्हा हा व्यवसाय बंद करण्याचा आदेश असल्याने आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ आली आहे.- मयूर जाधव, सरचिटणीस, राष्ट्रीय नाभिक संघटना

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसpalgharपालघर