शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट; शनिवारी अवघ्या ३७१ रुग्णांची नोंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 21:15 IST

coronavirus in Thane : ठाणे जिल्ह्यात अन्य काही दिवसांच्या कालावधीच्या तुलनेत शनिवारी रुग्ण संख्या घटली आहे गेल्या २४ तासात कोरोनाचे  ३७१ रुग्ण आढळले आहेत.

ठाणे - जिल्ह्यात अन्य काही दिवसांच्या कालावधीच्या तुलनेत शनिवारी रुग्ण संख्या घटली आहे गेल्या २४ तासात कोरोनाचे  ३७१ रुग्ण आढळले आहेत. तर सात जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता दोन लाख ४६ हजार ७०२ रुग्णांची नोंद झाली असून मृतांची संख्या सहा हजार २१ झाली आहे.  

 ठाणे शहरात १२९ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ५६ हजार ५१९ झाली आहे. शहरात तीन  मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ३२६ झाली. कल्याण - डोंबिवलीत ७९ रुग्णांची वाढ झाली असून दोन मृत्यू आहे. आता ५७ हजार ३८० रुग्ण बाधीत असून एक हजार ११६ मृत्यूची नोंंद आहे.  उल्हासनगरमध्ये ११ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या ११ हजार ४२९ झाली. तर, ३६२ मृतांची संख्या आहे. भिवंडीला एक बाधीत आढळून आले असून एकही मृत्यू नाही. आता बाधीत सहा हजार ६३३ असून मृतांची संख्या ३५२ आहे. मीरा भाईंदरमध्ये ३७  रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. या शहरात  बाधितांची संख्या २५ हजार ७६८ असून मृतांची संख्या ७८९ आहे.

अंबरनाथमध्ये १६ रुग्ण आढळले असून मृत्यू नाही. येथे बाधीत आठ  हजार ३९० असून मृत्यू ३०८ आहेत. बदलापूरमध्ये १२ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत नऊ हजार २६ झाले असून एकही मृत्यू नाही. मृत्यूची संख्या ११९ आहे. ग्रामीणमध्ये १० रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही. आता बाधीत १८ हजार ८७९ आणि आतापर्यंत ५८२ मृत्यू झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे