शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: केडीएमटी वाहकाचा कोरोनामुळे झाला मृत्यू; आणखी चौघांना लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 03:26 IST

मृत्यूच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना ५० लाखांचा कोरोना विमा लागू करावा या मागणीचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी महापालिका कामगार कर्मचारी संघटनेतर्फे वारंवार करण्यात आली आहे

कल्याण : कोरोनाबाधित केडीएमटी चालकाचा गुरुवारी खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी पहाटे कोरोनामुळे एका वाहकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ५० वर्षीय वाहकावर ठाणे सिव्हिल येथे उपचार सुरू होते. एका सहाय्यक वाहतूक निरीक्षकासह दोन वाहक आणि एक महिला शिपाई अशा उपक्रमातील चौघांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

मृत्यूच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना ५० लाखांचा कोरोना विमा लागू करावा या मागणीचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी महापालिका कामगार कर्मचारी संघटनेतर्फे वारंवार करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र ५ मे रोजी देण्यात आले होते. कोरोनामुळे एखादा अधिकारी किंवा कर्मचाºयाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला नोकरीत सामावून घ्यावे. कोरोना वैद्यकीय चाचणी तातडीने करण्यात यावी. जे कर्मचारी कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवा बजावत आहेत. त्यांना प्रोत्साहन भत्ता मिळावा या मागण्यांकडेही लक्ष वेधले होते. आजतागायत यातील कोणतीही मागणी पूर्ण झालेली नाही. आतापर्यंत उपक्रमातील सात कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील दोघांचा मृत्यू झाला तर एकाने कोरोनावर मात केली आहे तर चार जण रुग्णालयात उपचार घेत आहेत.व्यवस्थापकांशी फोनवर चर्चाकोरोनाची लागण होण्याचे वाढते प्रमाण पाहता आता तरी मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी कामगार कर्मचारी संघटनेने केली आहे. रविवारी पदाधिकाºयांनी उपक्रमाचे व्यवस्थापक मारुती खोडके यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. सोमवारी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे आश्वासन खोडके यांनी दिल्याची माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष कृष्णा टकले यांनी दिली.कल्याण-डोंबिवलीत ३६९ नवे कोरोना रुग्णकल्याण : केडीएमसीच्या हद्दीत कोरोनामुळे रविवारी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या १०७ इतकी झाली आहे. दुसरीकडे कोरोनाचे ३६९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या पाच हजार ६७८ इतकी झाली आहे. तर तीन हजार ३७२ रुग्णांवर उपचार सुरू असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या दोन हजार १९९ असल्याची माहिती केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. दरम्यान, मागील काही दिवसांपासून केडीएमसी क्षेत्रात रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. यामुळेच अधिक कडक निर्बंध घालण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस