शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: अवाजवी बिल आकारणाऱ्या रुग्णालयास केडीएमसीचा दणका, परवाना केला रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 20:57 IST

कोरोनाबाधित रुग्ण महिलेस जास्तीचे बिल आकारण्यात आले होते. या महिलेला पीपीई कीट व कोविड कच-याची विल्हेवाट लावण्याचेही बिल आकारले गेले होते. या महिलेला डिस्चार्ज दिला जात नव्हता.

कल्याण - कोरोना रुग्णांवर केलेल्या उपचारापोटी जास्तीचे बिल आकारणा:या श्रीदेवी रुग्णालयास कल्याण डोंेबिवली महापालिकेने दणका दिला आहे. या रुग्णालयाचा परवाना 31 ऑगस्टर्पयत रद्द करण्यात आला आहे. मात्र त्याठिकाणी अन्य उपचार घेत असलेल्या रुग्णावर उपचार सुरु राहितील. नवे रुग्ण घेता येणार नाही. त्याचबरोबर डायलिसीस रुग्णावरील उपचार सुरु राहतील अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.कोरोना बाधित रुग्ण महिलेस जास्तीचे बिल आकारण्यात आले होते. या महिलेला पीपीई कीट व कोविड कच-याची विल्हेवाट लावण्याचेही बिल आकारले गेले होते. या महिलेला डिस्चार्ज दिला जात नव्हता. या प्रकरणी शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी पीपीई कीट घालून महिला रुग्णास उचलून नेले हाते. तसेच रुग्णालय प्रशासनास जाब विचारला होता. तसेच रुग्णालयाच्या विरोधात कारवाईची मागणी महापालिका आयुक्तांकडे गायकवाड यांनी केली होती. या नंतरही दोन रुग्णांकडून जास्तीचे बिल आकारले गेल्याची तक्रार पालिका प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. या प्रकरणी पालिकेने रुग्णालयास नोटिस पाठवून विचारणा केली होती. मात्र रुग्णालयाने त्याचे उत्तर दिले नाही.या रुग्णालयाचा परवाना पालिकेने 31 ऑगस्टर्पयत रद्द केला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी दिली आहे.  रुग्णास आकारलेले जास्तीचे पैसे परत केले नाही तर कारवाई कायम राहिल असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. रुग्णास १ लाख ७० हजार रुपयांचे बिल आकारले होते. त्यात सूट दिली. तरी देखील ते बिल एक लाख १० हजार रुपयांचे झाले होते. सूट दिल्यानंतरही बिलाची रक्कम सरकारी दरानुसार होत नसल्याचे पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाhospitalहॉस्पिटल