शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे 5 नवे रुग्ण; कोरोना बाधितांची एकूण संख्या 43वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 16:39 IST

नव्याने आढळून आलेल्या पाच रुग्णापैकी दोन डोंबिवली पूर्वेतील, एक डोंबिवली पश्चिमेतील आणि  दोन कल्याण कल्याण पूर्वेतील रुग्ण आहेत. पाचही रुग्ण या महिला आहेत.

कल्याण-कल्याण डोंबिवलीत आज कोरोनाचे 5 नवे रुग्ण आढळून आले आहेत.  त्यामुळे महापालिका हद्दीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 43 झाली आहे. महापालिका हद्दीतील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला असल्याने प्रशासनाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब ठरत आहे. नव्याने आढळून आलेल्या पाच रुग्णापैकी दोन डोंबिवली पूर्वेतील, एक डोंबिवली पश्चिमेतील आणि  दोन कल्याण कल्याण पूर्वेतील रुग्ण आहेत. पाचही रुग्ण या महिला आहेत.कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका मुख्यालयात येणारे महापालिकेचे कर्मचारी व अधिका-यांनी त्यांच्या तोंडावर मास्क लावणे बंधनकारक आहे. कार्यालयात आल्यापासून कार्यालय सोडण्यापर्यंत हा मास्क लावला गेला पाहिजे. त्याचबरोबर महापालिका मुख्यालयात येणा-या नागरिकांनी मास्क लावूनच महापालिका मुख्यालयात यावे. अन्यथा त्याना मुख्यालयात प्रवेश नाकारला जाईल, असे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज दिले आहे.दरम्यान महापालिका हद्दीतील गर्दी टाळण्यासाठी औषधांची दुकाने, रुग्णालये, दवाखाने, गॅस वितरक एजेन्सी वगळता बेकरी, डेअरी, किराणा, भाजीपाला व खाद्यपदार्थाची दुकाने दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेत बंद ठेवण्यात यावीत, असे आदेश आयुक्त सूर्यवंशी यांनी दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी उद्या 10 एप्रिलपासून करण्यात यावी. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस