शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Kalyan-Dombivali : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे 27 नवे रुग्ण; खाजगी डॉक्टरसह नर्स, पोलिसांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 21:45 IST

CoronaVirus News Marathi in Kalyan-Dombivali : डोंबिवली पूर्वेतील 69 वर्षीय खाजगी डॉक्टरला कोरोना झाला आहे.

कल्याण: कल्याणडोंबिवली महापालिका हद्दीत आज कोरोनाची लागण झालेले 27  नवे रुग्ण आढळून आले आहे. नव्या रुग्णांमध्ये डोंबिवलीतील खाजगी डॉक्टरसह मुंबईतील नर्स, पोलिस यांचा समावेश आहे. महापालिका हद्दीत एकूण रुग्णांची संख्या 280 झाली आहे.

डोंबिवली पूर्वेतील 69 वर्षीय खाजगी डॉक्टरला कोरोना झाला आहे. कल्याण पूर्व व पश्चिमेतील दोन व डोंबिवली पूर्व पश्चिमेतील दोन अशा चार नर्सना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी तीन नर्स या सरकारी रुग्णालयात मुंबईत कार्यरत आहे. तर एक नर्स ही ठाण्यातील खाजगी रुग्णालयात कार्यरत आहे. कल्याण पूर्वेतील तीन सरकारी कर्मचा-यांना कोरोना झाला आहे. दोन पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी एक पोलीस हा कल्याण पश्चिमेत तर दुसरा कल्याण पूर्वेत राहणारा आहे. तर वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत कर्तव्य बजाविणारा पोलीस कर्मचारीही कोरोनाचा शिकार झाला आहे. सरकारी सेवेतील सुरक्षा रक्षकालाही लागण झाली आहे. तो कल्याण पूर्वेत राहणारा आहे. डों

बिवली पश्चिमेतील महिला लॅब टेक्निशियन  तसेच गुजरात येथील खाजगी कंपनीत काम करणारा यालाही कोरोना झाला आहे. गुजरातच्या कंपनीत काम करणारा डोंबिवली पूर्वेत राहतो. महिला फार्मासिस्ट हिलाही कोरोनाची लागण झाली आहे. ती कल्याण पश्चिमेत राहते. कल्याण पूव्रेतील वाशी येथे काम करणारा कर्मचा-यासह कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचा-यास कोरोना झाला आहे. बाजार समितीतील कर्मचारी हा डोंबिवली पश्चिमेला राहणारा आहे. त्याचबरोबर कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आणखीन एका कर्मचा-यास कोरोनाची लागण झाली आहे. तो डोंबिवली पूर्वेत राहतो.

कल्याण पश्चिमेतील चार जण हे कोरोना बाधिताच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोना झाला आहे. कल्याण पश्चिमेतील दोन विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. नव्या आढळून आलेल्या 27 रुग्णांपैकी 20 जण हे मुंबई, ठाणे, वाशी याठिकाणी काम करणारे आहेत. एक रुग्ण हा परराज्य गुजरात येथून आलेला आहे. शहरातील केवळ सातच रुग्ण आहेत. आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी 76 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 200 आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkalyanकल्याणdombivaliडोंबिवली