शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
4
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
5
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
6
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
7
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
8
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
9
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
10
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
11
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
12
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
13
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
14
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
15
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
16
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
17
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
18
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
19
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
20
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...

CoronaVirus : उल्हासनगर महापालिकेत डॉक्टरांसह अन्य पदाची जम्बो भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 18:01 IST

Ulhasnagar Municipal Corporation : उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःचे रुग्णालय नसल्याने, महापालिकेला आरोग्य सुविधेबाबत राज्य शासनाच्या मध्यवर्ती रुग्णालयावर अवलंबून होते.

उल्हासनगर : शहरात कोरोना रुग्णाची उपचारादरम्यान हेडसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर महापालिकेने डॉक्टरांसह अन्य पदाची तात्पुरत्या स्वरूपात जम्बो भरती सुरू केली. डॉक्टरांची ४५, परिचारिका २६६, वॉर्डबॉय ३१ यांच्यासह अन्य पदे भरण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. (CoronaVirus: Jumbo recruitment of doctors and other posts in Ulhasnagar Municipal Corporation)

उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःचे रुग्णालय नसल्याने, महापालिकेला आरोग्य सुविधेबाबत राज्य शासनाच्या मध्यवर्ती रुग्णालयावर अवलंबून होते. कोरोना महामारीत रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा मिळण्यासाठी महापालिकेने खाजगी साई प्लॅटिनम रुग्णालय दरमहा २० लाख रुपये भाडेतत्वावर घेतले. दरम्यान, कोरोना रुग्णाची संख्या सातत्याने वाढत असल्याने, डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. 

आरोग्य सेवेवर ताण पडू नये, म्हणून आयुक्त डॉ. राजा दयानिधी, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त अशोक नाईकवाडी, मदन सोंडे, वैधकीय अधिकारी दीपक पगारे, डॉ राजा रिजवानी, डॉ अनिता सपकाळे आदींनी डॉक्टरसह अन्य पदे तात्पुरत्या स्वरूपात भरतीचा करण्याचा निर्णय घेतला. वाढत्या कोरोना रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यासाठी, महापालिका शाळा इमारती मध्ये कोरोना आरोग्य सुविधा केंद्र सुरू करण्याचे संकेत दिले. 

महापालिका कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी फिजिशियन डॉक्टरची १०, भुलतज्ञ डॉक्टरची १०, वैधकीय अधिकाऱ्याची २५, परिचरिकेची २६६, प्रयोगशाळा तज्ञ ६, औषध निर्माता ६ वॉर्डबॉयची ३१ असे एकून ३५३ पदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्यात येत आहे. गेल्या वर्षी महापालिकेने डॉक्टरसह अन्य पदे तात्पुरत्या स्वरूपात भरती केले होते.

दरम्यानच्या काळात कोरोना रुग्णाची संख्या कमी झाल्याने, अनेक डॉक्टरसह अन्य कर्मचारी महापालिका नोकरी सोडून गेले. त्यामुळे डॉक्टरसह अन्य पदे भरण्याची वेळ हापालिकेवर आली. दरम्यान कोरोना रुग्णाची संख्या वाढल्याने डॉक्टरसह ३५३ पदे भरती करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरसह अन्य पदाची भरती केल्यास रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा देता येईल . अशी प्रतिक्रिया उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली.

डॉक्टरांचा चांगला प्रतिसादभरतील डॉक्टरांचा प्रतिसाद महापालिकेने डॉक्टरसह अन्य पदाची भरती सुरू केली असून आजच्या डॉक्टर भरतीला डॉक्टरांनी चांगला प्रतिसाद दिला. तर परिचारिकासह अन्य पदाची भरती सोमवार ते शुक्रवार दरम्यान होणार आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस