शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
3
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
4
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
5
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
6
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
7
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
8
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
9
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
10
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
11
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
12
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
13
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
14
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
15
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
16
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
17
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
18
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
19
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
20
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी

Coronavirus : ठाणे जिल्ह्यात २३०१ कोरोना रुग्णांची वाढ; ५० जणांचा मृत्यू   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 22:12 IST

Coronavirus in Thane : ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येत गुरूवारी दोन हजार ३०१ रुग्णांची वाढ झाली असून ५० जणांचा मृत्यू झाला आहे‌. जिल्ह्यातील रुग्ण संख्या आता चार लाख ८२ हजार ४९५ झाली आहे, तर मृतांची संख्या सात हजार ८८३ नोंदली आहे.

ठाणे - जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येत गुरूवारी दोन हजार ३०१ रुग्णांची वाढ झाली असून ५० जणांचा मृत्यू झाला आहे‌. जिल्ह्यातील रुग्ण संख्या आता चार लाख ८२ हजार ४९५ झाली आहे, तर मृतांची संख्या सात हजार ८८३ नोंदली आहे.

ठाणे शहर परिसरात ६०१ रुग्ण आढळले असून आठ मृत्यू झाले आहेत. या शहरातील रुग्णांची संख्या आता एक लाख २२ हजार ७९३ तर मृतांची संख्या एक हजार ७२५ नोंदली गेली आहे. कल्याण डोंबिवलीत ५८४ नव्याने वाढ होऊन १२ जणांचा आज मृत्यू झाला आहे. या मनपा क्षेत्रात एक लाख २४ हजार ७१३ रुग्णांस एक हजार ४९८ मृतांची आजपर्यंत नोंद झाली आहे.

 उल्हासनगरमध्ये ४२ रुग्णांची वाढ होऊन एकाचा मृत्यू झाला आहे. या शहरात आजपर्यंत १९ हजार २३९ रुग्णांची व ४४१ मृतांची नोंद करण्यात आली आहे. भिवंडी मनपा क्षेत्रात ३९ रुग्णांची वाढ व एक मृत्यू झाला. आतापर्यंत या शहरातल्या हजार दोन रुग्णांची आणि ४०१ मृतांची नोंद करण्यात आली आहे. मीरा भाईंदर शहरातही आज २५४ रुग्णांच्या वाढीसह १२ जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात ४५ हजार ३०० रुग्णांची व एक हजार ८६ मृत्यूची नोंद झाली आहे.

 अंबरनाथ शहरात १०१ रुग्ण वाढ होऊन एकाचा मृत्यू झाला आहे. या शहरातील आतापर्यंत १८ हजार २८५ रुग्ण संख्येसह ३९० मृतांची नोंद करण्यात आली आहे. बदलापूर परिसरात ११२ बाधीत व एक मृत्यू नोंद झाला आहे. आतापर्यंत १९ हजार २९४ बाधीत व २०२ मृत्यू या शहरात झालेले आहेत. जिल्ह्यातील गांवपाड्यात आजही ३२० बाधीत आढळले असून सात मृत्यू झाले आहेत. यामुळे आजपर्यंत येथील २८ हजार ४५९ बाधीत व ७१८ मृतांची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे