शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

Coronavirus: न दिसणाऱ्या काेराेनानं उघडले सर्वांचे डाेळे; फक्त रक्ताचे नातेवाईक आपल्या जवळचे नसतात, तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 02:19 IST

२३ मार्च २०२० पासून लाॅकडाऊन सुरू झाले. कधीही अशा परिस्थितीचा सामना न करणारे तुम्ही आम्ही अचानक घरात कैद झालाे.

कराेना काेराना काेराेना... कधीही एकिवात न असणारा विषाणू संपूर्ण जगभरात पसरला आणि संपूर्ण मानवजातीचे अस्तित्व संकटात आले. डाेळ्यांनी न दिसणाऱ्या या विषाणूने हाहाकार माजवला. चीनमध्ये निर्माण झालेला हा विषाणू भारतात वणव्यासारखा पसरला आणि संपूर्ण मानवजात ही संकटाच्या खाईत ढकलली गेली.

२३ मार्च २०२० पासून लाॅकडाऊन सुरू झाले. कधीही अशा परिस्थितीचा सामना न करणारे तुम्ही आम्ही अचानक घरात कैद झालाे. फक्त जीवनावश्यक वस्तूच तेवढ्या मिळायला लागल्या.  हातावर पाेट असणारे लाेेक आपल्या मूळ गावी जायला निघाले. बस, रेल्वे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद झाली, तरी लाेक खासगी वाहनाने तर काेणी चक्क पायीच कुटुंबातील सदस्यांना घेऊन मार्गक्रमण करायला निघाले. याच काळात माणुसकीचे दर्शन घडले. अनेक सामाजिक संस्थांनी गरजू लाेकांना धान्यवाटप केले. त्यांची राहण्याची, खाण्याची व्यवस्था केली. पडद्यावर खलनायकाची भूमिका करणारा साेनू सूदसारखा अभिनेता प्रत्यक्ष जीवनात सर्वांसाठी हिराे ठरला. माणसांतच देव आहे आणि संकटात जाे धावून येताे ताेच खरा माणूस हाेय, याची प्रचीती या काळात आली. 

या काेराेनाने आपल्याला खूप काही शिकवले. घरात एकमेकांसाठी भरपूर वेळ द्यायला शिकवले. छंद, आवडी-निवडी जाेपासता आल्या. मी  शिक्षिका असल्यामुळे कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नव्हता. मात्र, या लाॅकडाऊनमध्ये मला माझ्या मुलांसाठी वेळ देता आला. काेराेना काळात साेसायटीतील लाेकदेखील कुटुंबाप्रमाणे वाटायला लागले.  मुख्य म्हणजे ऑनलाइन बऱ्याचशा गाेष्टी यामुळे शिकायला मिळाल्या. माेबाइल सर्वांचा अत्यंत जवळचा मित्र बनला. आता माेबाइलचे फायदे व ताेटे दाेन्ही आहेत. मात्र, हाच माेबाइल सर्वांचा जिवलग असा मित्र बनला.

या काळात मला समजले की, फक्त रक्ताचे नातेवाईक आपल्या जवळचे नसतात, तर माणुसकीचे नाते त्याहून महान असते. आपल्या आजूबाजूला नीट पाहिले तर खराेखरच आपल्या नातेवाइकांपेक्षा जास्त जवळचे आपले शेजारी आणि परिसरातील लाेक असतात. याकाळात सर्वांना माेठा धडा मिळाला असेल तर ताे स्वच्छतेचा. एकमेकांपासून सुरक्षित अंतर, वारंवार हात धुण्याची सवय, मास्क लावणे, गर्दी टाळणे यामुळे सर्वत्र स्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले. प्रदूषणही कमी झाले. ध्वनी प्रदूषण कमी झाले.  स्वच्छतेचे महत्त्व आपणा सर्वांना काेराेना शिकवून गेला. काेराेनाने आपल्याला एक महत्त्वाची गाेष्ट शिकवली, ती म्हणजे आर्थिक शिस्त, सावर्जनिक ठिकाणच्या स्वच्छतेचे महत्त्व. डाेळ्यांनी न दिसणाऱ्या काेराेनाने आपणा सर्वांचे डाेळे उघडले.     

वर्षा राठाेड, सहशिक्षिका, कल्याण

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या