शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: नगरसेवकाने खडसावताच रुग्णाला मिळाले उपचार; चार तास प्रेमाने केली विनंती, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 00:47 IST

चार तास प्रेमाने विनंती करूनही जे शक्य झाले नाही, ते काम अपशब्द वापरल्यावर झाले याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.

पंकज पाटील 

अंबरनाथ : शहरात वैद्यकीय व्यवस्थेची दुरवस्था झाली आहे. लक्षण असलेल्या रुग्णांवर उपचारांची छाया रुग्णालयाकडे जबाबदारी असतानाही तेथे उपचार दिले जात नसल्याचे उघड झाले आहे. रविवारी एका महिला रुग्णाला त्रास होत असतानाही तिला छाया रुग्णालयाच्या आवारात सहा तास उपचारांसाठी ताटकळावे लागले. उपचार मिळत नसल्याने नगरसेवकांनी रुग्णालय प्रशासनाला सुरुवातील विनंती करून नंतर धारेवर धरल्याने अखेर त्या महिलेला दाखल करण्यात आले.

अंबरनाथ न्यू कॉलनी परिसरात राहणारी महिलेला श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये गेली होती. मात्र तेथे तिला उपचारांसाठी दाखल न केल्याने ती महिला दुपारी २ वाजता छाया उपजिल्हा रुग्णालयात दाखल होण्यासाठी आली. तिला श्वसनाचा त्रास होत असल्याने त्या ठिकाणच्या डॉक्टरांनी तिला लागलीच पुढे जाण्याचा सल्ला दिला. मात्र पुढे गेल्यावरही तिला दाखल करून न घेतल्याने ती उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातून पुन्हा छाया रुग्णालयात आली. रुग्णालय प्रशासनाने तिला रात्री ८ वाजता ठाण्याच्या मध्यवर्ती रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. तोपर्यंत महिलेची प्रकृती खालावल्यामुळे तिला त्वरित उपचारांची आवश्यकता होती.चार तास प्रेमाने करत होते विनंतीशहरात किंवा उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार मिळावे, यासाठी नगरसेवक मिलिंद पाटील हे प्रयत्न करीत होते. मात्र, कुठेच उपचारांसाठी दाखल केले जात नसल्याने त्यांनी छाया रुग्णालय प्रशासनालाच विनंती केली. तरीही, प्रशासन ऐकत नसल्याने पाटील यांचा तोल जाऊ न त्यांनी प्रशासनाला धारेवर धरत अपशब्द वापरले. चार तास प्रेमाने विनंती करूनही जे शक्य झाले नाही, ते काम अपशब्द वापरल्यावर झाले, याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस