शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
7
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
9
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
10
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
11
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
12
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
13
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
14
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
15
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
16
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
17
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
18
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
19
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
20
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू

Coronavirus: कोरोना संकटाविरुद्ध सर्वांनी मिळून, एकजुटीने, संघटीतपणे लढा देऊ - पालकमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 20:17 IST

या बैठकीमध्ये संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. कोरोना व्हायरसचा फैलाव हा प्रामुख्याने एकमेकांच्या संपर्कातून होत असल्याने सोशल डिस्टान्सींगला  सर्वांनी प्राधान्य दिले पाहिजे

ठाणे - सध्या कोरोना विषाणूशी लढाई आपण लढत आहे. सर्वत्र युद्ध पातळीवर कोरोनाशी लढण्याची सज्जता करण्यात आली आहे. सर्व नागरिकांनी शासनाच्या सुचनांचे पालन करून शासनास सहकार्य करावे. जिल्हा प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कटीबद्ध आहे. ठाणे जिल्ह्यात एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. कोरोना संकटाविरुद्ध सर्वांनी मिळून, एकजुटीने, संघटीतपणे लढा देऊ या  असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

ठाणे जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे, हे प्रमाण रोखण्याच्या दृष्टीकोनातून व सद्यस्थीतीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस ठाण्याचे खासदार राजन विचारे, आमदार संजय केळकर, महापौर नरेश म्हस्के,महापालिका आयुक्त विजय सिंघल, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी महापालिकेस सहकार्य करीत असलेले सर्व डॉक्टर्स उपस्थित  होते.    या बैठकीमध्ये संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. कोरोना व्हायरसचा फैलाव हा प्रामुख्याने एकमेकांच्या संपर्कातून होत असल्याने सोशल डिस्टान्सींगला  सर्वांनी प्राधान्य दिले पाहिजे व याबाबत नागरिकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. ज्या व्यक्तींना कोरोनाची लक्षणे दिसून येत असतील अशा सर्वांनी स्वत: पुढे येवून तपासणी करुन घेणे आवश्यक आहे तर आणि तरच आपण या आजाराची साखळी तोडून यातून मुक्त होवू शकतो. ज्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे, अशा व्यक्तींचे नातेवाईक व त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी करण्यात यावी, तसेच कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रात रुग्णालयांची संख्या वाढवून यामध्ये आवश्यक असलेले डॉक्टर्स, नर्सेस व इतर कर्मचारी उपलब्ध  करुन त्यांना आवश्यक असलेली सर्व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करुन त्यांची निवास व भोजन व्यवस्था योग्य प्रकारे राहीत याकडे कटाक्षाने लक्ष राहील अशा सूचना पालकमंत्री एकनाथ  शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या.

तसेच आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेवून आपल्याला  अधिकचे डॉक्टर नियुक्त करणे आवश्यक आहे, यासाठी मुंबईच्या धर्तीवर डॉक्टरांना योग्य ते मानधन देवून याबाबत तातडीने कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना सामान्य  जिल्हा  रुग्णालय तसेच महापालिका प्रशासनाला दिल्या. तसेच काही ठिकाणी भाजीपाला व अन्नधान्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असल्याची बाब निदर्शनास येत आहे यासाठी नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी आवश्यकतेनुसार चित्रफलक लावण्यात यावेत व पोलीसांनी दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे असेही आवाहन पालकमंत्रयांनी या बैठकीत  केले.

राज्यामध्ये लागू केलेल्या संचारबंदीच्या कालावधीत अनेक नागरिक अडकले असून तसेच हातमजुरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या अनेक कुटुंबावर  उपासमारीची वेळ आली आहे, अशा नागरिकांना अनेक संस्थांच्या माध्यमातून नियमित जेवण पुरविण्यात येत आहे. स्वत:हून पुढे येवून ज्या संस्थांनी अतिशय मोलाचे योगदान दिले आहे त्याबद्दल पालकमंत्री एकनाथ  शिंदे यांनी त्यांच आभार व्यक्त करुन  अभिनंदन केले. परंतु या सामाजिक संस्था गेल्या 25 दिवसापासून अन्नधान्याचे वाटप करीत आहे त्यांना आता आवश्यक अन्नधान्य व भाजीपाला उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे, या संस्था स्वत: अन्न  शिजवून त्याचे वितरण करण्याचे काम करीत आहे तरी या संस्थांना तांदूळ, डाळ, तेल, मसाले, भाजीपाला  आवश्यकतेनुसार प्रभागसमितीनिहाय उपलब्ध करुन देण्याच्या सूचना यावेळी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहे.

कोरोना संकट हे मोठे आहे,  याला प्रतिबंध करण्यासाठी सर्वच यंत्रणा वेगाने काम करीत आहे, परंतु इतर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना उपचार घेणे आवश्यक आहे, याकडे देखील दुर्लक्ष चालणार नाही तरी अशा रुग्णांना योग्य उपचार वेळेत मिळतील या दृष्टीने सर्व खाजगी रुग्णांलये सुरू राहतील या दृष्टीने सर्व संबंधितांना आदेश व्हावेत अशी सूचना या बैठकीत पालकमंत्र्यांनी केली. कोरोनाचा सामना करण्यासाठीच सर्वच विभाग प्रभावीपणे काम करीत आहे, यामध्ये कोणतीही अडचण  निर्माण झाल्यास पालकमंत्री या नात्याने मला वैयक्तीक निदर्शनास आणून द्यावी याबाबत आपल्याला तातडीने योग्य ती  मदत व सहकार्य केले जाईल अशी ग्वाही पालकमंत्री एकनाथ  शिंदे यांनी यावेळी दिली.  ठाणेकर नागरिकांनी आजवर  संयम दाखवून प्रशासनास जे सहकार्य केले आहे त्याबद्दल त्यांचे आभार व्यकत करीत कोरोनाचे सावट दूर होईपर्यत असेच सहकार्य करावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEknath Shindeएकनाथ शिंदे