शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: देवदर्शनाला गेलेले कुटुंब लॉकडाउनमुळे अडकून पडले, राज्य सरकारला घातले साकडे  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 02:20 IST

अंबरनाथच्या वांद्रापाडा परिसरात राहणारे करण भाट हे कुटुंबातील १८ सदस्यांसह १६ ते २२ मार्च दरम्यान राजस्थानमधील अजमेर येथे देवदर्शनासाठी गेले होते. यामध्ये महिला, वृद्ध तसेच लहान मुलांचा समावेश आहे.

अंबरनाथ : देवदर्शनासाठी गेलेले अंबरनाथमधील कुटुंब लॉकडाउनमुळे राजस्थानमध्ये अडकले आहे. या कुटुंबाला अंबरनाथमध्ये परत आणण्याची व्यवस्था राज्य सरकारने करावी, अशी मागणी होत आहे. अंबरनाथच्या वांद्रापाडा परिसरात राहणारे करण भाट हे कुटुंबातील १८ सदस्यांसह १६ ते २२ मार्च दरम्यान राजस्थानमधील अजमेर येथे देवदर्शनासाठी गेले होते. यामध्ये महिला, वृद्ध तसेच लहान मुलांचा समावेश आहे.लॉकडाउनच्या काळात अजमेरला राहत असलेल्या ठिकाणी जेवणाचे हाल होत आहेत. याशिवाय आवश्यक औषधे वेळेवर उपलब्ध होत नाहीत, परत जाण्याविषयी विचारणा केल्यास कुणी धड उत्तर देत नाहीत. वैद्यकीय तपासणीसाठी गेलो तर योग्य सहकार्य मिळाले नाही. ज्याठिकाणी राहण्यास परवानगी मिळाली, त्याठिकाणी पाणी आणि वीजपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आम्हाला लवकर अंबरनाथला नेण्याची व्यवस्थाकरा, अशी मागणी भाट यांनी केली आहे.ज्याप्रमाणे परदेशात अडकलेल्या भारतीयांना केंद्र सरकारने प्रयत्न करून मायदेशी परत आणले, त्याचप्रमाणे अजमेरला अडकलेल्या भाट कुटुंबीयांना राज्य सरकारने अंबरनाथला आणावे, अशा मागणीचे टिष्ट्वट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, मनसे नेते अमित ठाकरे यांच्याकडे केली असल्याचे मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी सांगितले.२१ मार्चपासून अजमेरात अंबरनाथ येथील भाट कुटुंबीयांचे २२ मार्च रोजी अजमेरहून अंबरनाथला परतीच्या प्रवासासाठी रेल्वेचे आरक्षणही झाले होते. मात्र, २१ मार्चला देशभरात संचारबंदी लागू झाली आणि तेव्हापासून आम्ही अजमेरलाच अडकून पडलो आहोत, असे करण भाट यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे