शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

CoronaVirus : ठाण्यात रुग्णदुपटीचा कालावधी १३५ दिवसांवर, कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2020 12:14 IST

मार्च महिन्यापासून ठाण्यात कोरोना रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर जून, जुलै आणि ऑगस्टशिवाय सप्टेंबर महिन्यातही रुग्णांची संख्या वाढताना दिसली. सप्टेंबर महिन्यात १० हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले असले, तरी आठ हजारांहून अधिक बरेदेखील झाल्याचे दिसून आले आहे.

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले असून ते ५५०० च्या घरात आले असून नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाणही घटले आहे. तर, रुग्णदुपटीचा कालावधी ८५ दिवसांवरून १३५ दिवसांवर गेला असून बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्क्यांवर आले आहे. याशिवाय, मृत्युदरही आता २.५० टक्क्यांवर आला आहे.

मार्च महिन्यापासून ठाण्यात कोरोना रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर जून, जुलै आणि ऑगस्टशिवाय सप्टेंबर महिन्यातही रुग्णांची संख्या वाढताना दिसली. सप्टेंबर महिन्यात १० हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले असले, तरी आठ हजारांहून अधिक बरेदेखील झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, कोरोनास अटकाव करण्यासाठी पालिकेने चाचण्यांचे प्रमाण वाढवून ऑगस्ट अखेरपर्यंत रोज सरासरी २३०० चाचण्या केल्या जात होत्या आणि त्यामध्ये दोनशेच्या आसपास रुग्ण आढळत होते. सप्टेंबर महिन्यापासून चाचण्यांची संख्या दुप्पट केली आहे. त्यामुळे दिवसाला ५५०० हून अधिक चाचण्या केल्या जात आहेत. त्यात ४०० च्या आसपास रुग्ण आढळते होते. परंतु, आता ऑक्टोबरच्या पहिल्या १० दिवसांनंतर शहरात कोरोनाबाधितांची संख्या घटत असून २५० च्या खाली आहे. 

सप्टेंबर महिन्यात हेच प्रमाण ३०० वर होते. तर, सप्टेंबर महिना अखेरपर्यंत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्के होते. ते आता ९१ टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.

आतापर्यंत १,१२० जणांचा मृत्यूमागील सहा महिन्यांचा विचार केल्यास एप्रिल महिन्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९.७३ टक्के होते. ते ऑक्टोबरअखेरपर्यंत ९१ टक्क्यांवर आले आहे. तर, रुग्ण आढळण्याचे जे प्रमाण ६.४० टक्के होते, ते ऑगस्ट महिन्यात १५.६३ टक्के होते. ते आता ९.४१ टक्क्यांवर आले आहे. - रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91% वर आले आहे.- महापालिका क्षेत्रात आतापर्यंत ४४ हजार ७८९ रुग्ण आढळले आहेत. यापैकी ४० हजार ८६० रुग्ण बरे झाले आहेत, तर ११२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणेhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टर